नांदेडराजकीयव्हिडीओ

Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पदग्रहण सोहळ्याने शहरात राजकीय व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदभार स्वीकारण्याचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला.

गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या निवासस्थानापासून फटाक्यांच्या आतषबाजीत व घोषणांनी दणदणीत भव्य रॅली नगरपंचायत कार्यालया पर्यंत काढण्यात आली. या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत संपूर्ण हिमायतनगरचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी मंचावर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नवनिर्वाचित नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG20260108133104 01 Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
oplus_0

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी श्री. ताडेवाड यांच्या हस्ते नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्यासह सर्व मान्यवर व नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्वागत-सन्मान करण्यात आला. त्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांनी विधिवत पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

IMG20260108131103 01 Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
oplus_0

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले की, “हिमायतनगर शहरात मागील काळात रखडलेली सर्व विकासकामे येत्या पाच वर्षांत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक पूर्ण करतील आणि जनतेने दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील.” त्यांनी नगराध्यक्ष रफिक सेठ व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

IMG 20260109 070754 Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
Oplus_16908288

नव्या नेतृत्वाकडून शहराच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून, रखडलेली विकासकामे मार्गी लागून मूलभूत सुविधा सक्षम होतील, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक आगामी काळात कोणत्या पद्धतीने शहराच्या विकासाला चालना देतात, याकडे संपूर्ण हिमायतनगरचे लक्ष लागून आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!