नांदेड| गेल्या अनेक दिवसा पासून नांदेड आरएमएसची आयसीएच सेवा बंद होती.त्यामुळे ग्राहकांची पत्रे वेळेवर पोहचली जात नसायची परिणामी डाक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता. नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून याचा जिल्ह्यातील ग्राहकांना फायदा होणार आहे.
डाक विभागा मार्फत चालणाऱ्या कामकाजाचा ओघ आता वाढता असून यात आरएमएस विभागाचे महत्वपूर्ण कामकाज आजही रात्र दिवस चालत असत .प्रत्येक ग्राहक हा आपली पत्रे वेळेवर पोहचावी या हेतूने डाक कार्यलायात जात असतो. व स्पीस पोस्ट करत असतो. मात्र गेल्या अनेक दिवसा पासून नांदेड जिल्ह्यातील स्पीड पोस्ट सेवा पूर्ण पणे विस्कळीत झाली होती.ग्राहकांनी खेड्यातून व तालुक्यातून नांदेड जिल्ह्या करीता बुक केलेले स्पीड पोस्ट आर्टिकल नांदेड आरएमएसला आयसीएच नसल्यामुळे पाठवता येत नव्हते.
परिणामी नांदेड जिल्ह्यात बुक केलेले स्पीड पोस्ट हे परभणी आयसीएच अशी स्पेशल ब्याग पाठवली जात असायची. त्यामुळे ग्राहकांच्या पत्राना एक दिवस विनाकारण विलंब होत असायचा. ग्राहकांचे हित लक्षात घेता डाक विभागाने नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ करण्याचे आदेश देण्यात आले असून आता जिल्ह्यातील स्पीड पोस्ट ग्राहकांना एक चांगल्या दर्जाची आती जलद स्पीड पोस्टच्या जलद स्पीड पोस्ट सेवा मिळणार आहे.
याकरिता नांदेड आरएमएसने पूर्ण तयारी केली असून नांदेड जिल्ह्यातील खेडेगाव, तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधील बुक होणारी स्पीड पोस्ट सेवा नांदेड आरएमएसला येऊन तिथे एस ओ वाईज सॉर्टींग होऊन नव्या पंखाची जलद स्पीड पोस्ट सेवा जिल्ह्यात वितरित केले जाणार असल्याने नांदेड जिल्ह्यात ग्राहकांच्या हातात जलद स्पीड पोस्ट सेवा मिळणार आहे. यात नांदेड आरएमएसचे कर्मचारी दर्जदार सेवा देण्यात तत्पर असून स्पीड पोस्ट सेवा सुरळीत करण्यात करीता नांदेड जिल्हाचे एल एस जी एसआरओ एम जी पाटोळे,
के टी कांबळे मॅडम,एफ एन पठाण,व्ही डी मुरकुटे,पी एच डोईफोडे,जी बी कदम,सौ एस बी अष्टीकर, व्ही एच हालकुडे,एस एन ताटे,वाय डी पाठण,डी एस गंगावरे, हरी ठोंबरे,डी जी आढाव,पी एस केंद्रे,बी बी चिवडे,एस के कवटकर,जी सी चारलेवार,ए एम देवाले,सह आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य करत आहेत.
नांदेड आरएमएसला स्पीड पोस्ट आयसीएच सेवेचा प्रारंभ झाल्यामुळे नक्कीच याचा ग्राहकांना फायदा होणार आहे.जलद गतीने कर्मचारी यांना अचूक कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता नांदेड आरएमएस येथे सायं पाच ते दहा प्रर्यंत स्पीड पोस्ट, रजिस्टर, पार्सल, तसेच फॉरेन आर्टिकल बुकिंग वेवस्था चालू करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा असे अव्हान नांदेड जिल्हाचे एलएसजी एसआरओ श्री एम जी पाटोळे यांनी केले आहे.