HomeनांदेडStorytelling by Ram Tarte today at Narangal : राम तरटे यांचे आज...

Storytelling by Ram Tarte today at Narangal : राम तरटे यांचे आज नरंगल येथे कथाकथन -NNL

नांदेड| प्रसिद्ध कथाकार तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे निवेदक , पत्रकार राम तरटे यांचे आज दि. ११ डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील नरंगल बु. येथे महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे.

श्री वीरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ नरंगल बु. संचलित महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आद्य संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव गोविंदराव पाटील नरंगलकर यांच्या ३५ व्या स्मृती दिनानिमित्त ‘लेखक आपल्या भेटीला…’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांचे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक देशमुख यांची उपस्थिती राहणार असून, प्राचार्य पी.एम. शिवारेड्डी, ए.एस. गोपछडे, पी.जी. हळदे, एस.जी. नक्कावार, एच.टी. सूर्यवंशी, एम.जी. डोकोरे, एच.बो. बोडके, आर.जी. बरडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी माजी मुख्याध्यापक माधव मोखेडे हेही कथा सांगणार आहेत. आयोजित कथाकथन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अशोक देशमुख यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments