HomeनांदेडDarshana Chayal : माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका दर्शनाताई...

Darshana Chayal : माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका दर्शनाताई चायल यांची सदिच्छा भेट

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्रमांक 1 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दर्शनाताई शरद चायल यांनी माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब यांच्या हदगाव येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले.

या भेटीदरम्यान माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी दर्शनाताई चायल यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वानखेडे परिवार आणि चायल परिवार यांच्यातील स्नेहसंबंध अनेक वर्षांपासून अतूट व जिव्हाळ्याचे असून, आजच्या भेटीमुळे हे नाते अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.

IMG 20260117 WA0005 Darshana Chayal : माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका दर्शनाताई चायल यांची सदिच्छा भेट

हिमायतनगरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे मत यावेळी माजी खासदार वानखेडे यांनी व्यक्त केले. सदिच्छा भेटीमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments