Darshana Chayal : माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका दर्शनाताई चायल यांची सदिच्छा भेट
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्रमांक 1 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दर्शनाताई शरद चायल यांनी माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब यांच्या हदगाव येथील मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
या भेटीदरम्यान माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी दर्शनाताई चायल यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वानखेडे परिवार आणि चायल परिवार यांच्यातील स्नेहसंबंध अनेक वर्षांपासून अतूट व जिव्हाळ्याचे असून, आजच्या भेटीमुळे हे नाते अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
हिमायतनगरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे मत यावेळी माजी खासदार वानखेडे यांनी व्यक्त केले. सदिच्छा भेटीमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक संदेश गेला आहे....
