HomeनांदेडMartyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर...

Martyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देगलूर,नांदेड। जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात वीरमरण आलेल्या देगलूर तालुक्यातील तमलूर येथील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे वय २९ या वीर जवनाच्या पार्थिवावर शुक्रवारी देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

FB IMG 1746797098022 Martyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर जवळील तंगधार येथे जात असताना सैन्य दलाचे वाहन कोसळून शहीद सचिन वनंजे यांच्या वाहनाला दिनांक ६ मे रोजी अपघात झाला होता. या दुर्घटनेत तब्बल ८ हजार फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचे हे वाहन कोसळले होते. कुपवाडमध्ये पाकिस्तान सीमेलगत बालाकोट तंगधार ही पोस्ट आहे. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. शहीद सचिन वनंजे यांना ८ महिन्याची एक मुलगी आहे. त्यांचे लग्न २०२२ मध्ये झाले होते.

IMG 20250509 160349 Martyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आ. जितेश अंतापूरकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील आदींसह देगलूर तसेच जिल्हाभरातील देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

IMG 20250509 185642 Martyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सचिन वनंजे वय 29 वर्ष हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे मुळ रहिवाशी होते. ते २०१७ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. त्यांना पहिली नियुक्ती सियाचीन भागात मिळाली होती. त्यानंतर पंजाबमधील जालंदरमध्ये ते देशसेवेसाठी तैनात होते. पंजाबनंतर गेल्या दीड वर्षांपासून ते श्रीनगरमध्ये सेवेत होते. ६ मे रोजी त्यांची पोस्टींग इतर ठिकाणी झाली होती. याच चौकीकडे सैन्य दलाचे वाहन त्यांना घेऊन जात होते. त्यावेळी ८ हजार फूट खोल दरीत त्यांचे वाहन कोसळले. या दुर्घटनेत ते शहीद झाले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments