Thursday, May 14

Take Action Illigal Liquor ; अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा,जवळा (मुरहार) येथील महिलांनी केले जमसंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

नांदेड। बारड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जवळा (मु.) ता. मुदखेड जिल्हा नांदेड येथील महिलांनी दि. ८ मे रोजी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सभासद असलेल्या मौजे जवळा येथील महिला मागील दीड दोन वर्षांपासून अवैध विक्री होत असलेली दारूची दुकाने बंद करावीत म्हणून निवेदने देऊन पाठपुरावा करीत आहेत.

जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,दारू बंदी अधिकारी आणि बारड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदींना त्यांनी अनेक निवेदने दिली आहेत.
परंतु दखल घेण्यात येत नसल्याने त्यांनी देशातील सर्वात मोठी महिला संघटना असलेल्या जमसंचे सभासदत्व स्वीकारले आणि ५ मे रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन दिले आणि सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ निवेदन व्हाट्सअपवर पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना विविध अधिकारी यांना दिल्या आणि तात्काळ एक पथक मौजे जवळा येथे पोहचले आणि फेरफटका मारून रिकाम्या हाताने परतले.
त्यांना एकही अवैध दारू विक्रेता मिळाला नाही असा अहवाल वरिष्ठांना सादर केला.

दारू विक्रेत्यांनी महिलांना लक्ष करीत धमकावण्यास सुरवात केली असून आंदोलक महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. असे त्यांनी निदर्शने करून दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. आंदोलक महिलांना काही त्रास झाला तर जिल्हा प्रशासन जबादार राहील असे पीडित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदरील निदर्शने आणि धरणे आंदोलनाचे नेतृत्व जमसं च्या जिल्हा अध्यक्षा कॉ.लता गायकवाड, उपाध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.रोहिणी पुंडे,प्रभावती पुंडे,शोभाबाई भिसे आदींनी केले तर मार्गदर्शन सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांनी केले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीबाई गोवंदे,रमाबाई खाडे,अनिताबाई बुक्तरे,सोनाली भिसे,सवर्णाबाई पुंडे,जया भिसे आदींनी प्रयत्न केले.
अशी माहिती जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!