उस्माननगर, माणिक भिसे| दि. 8 जाने. 2025 रोजी नांदेड येथील प.पू.जगदीश बाबा गोशाळा,खडकुत येथे महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ.अभिजीत राऊत यांचे शुभहस्ते प्रथम गोमातेचे पूजन करण्यात आले.
विशेष अतिथी डॉ.राजकुमार पडिले (प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त लातूर विभाग लातूर), प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुनील सूर्यवंशी (सदस्य गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन),प्रमुख अतिथी मा.डॉ.माधवराव साखरे (सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी) डॉ.विजय काटकाडे (सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नांदेड),डॉ. प्रवीणकुमार घुले (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातील चाळीस गोशाळांतील 100 च्या जवळपास संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र गोसेवा आयोगात नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना,परिपोषण योजना या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण, टॅगिंग,उपचार या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील गोशाळासाठी जिल्हा नियोजन मधून औषधी पुरवठा, खोडा व नावीन्यपूर्ण योजनेतून काही योजना तयार करता येईल या संदर्भात माहिती दिली. डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी याप्रसंगी गोशाळा कागदपत्रे, आवश्यक रजिस्टर व नोंदी,गोशाळा स्वच्छता,गोशाळा प्रचार प्रसार,गोशाळा चे विविध विभाग,निधी संकलन, गोशाळांसाठी शासनाच्या विविध योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना,गोसेवा आयोगाच्या योजना, संचालकांनी करावयाचे कामे अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी आ.श्री ओमप्रकाश पोकर्णा, गोशाळा महासंघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद घोरबांड गुरुजी, हरीश तिवारी(जगदीश जी महाराज गोशाळा सचिव), सत्यवान गरुडकर, रामजीभाई भानुशाली (गोरी),रघुनाथसुगावे,किरण बीचेवार, पांढरीपांडे, आशिष कदम यांसह अनेक गोशाळा संचालकांची उपस्थिती होती. गोभक्त विष्णू काबरा कैलास शर्मा यांनी उपस्थित गोशाळा संचालकांची भोजन व्यवस्था उत्तमरीत्या केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा पशुसंवर्धन विभाग व गोशाळा महासंघाने विशेष परिश्रम घेतले. डॉ.अरविंद गायकवाड (पशुसंवर्धन सहाय्यक उपायुक्त नांदेड) यांनी आभार प्रदर्शन केले.