उस्माननगर| लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणारा पत्रकार हा समाजाचा आरसा आहे . तसेच समाजातील वंचित घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम पत्रकार निभावत असतो. पत्रकारांनी निर्भिडपणे लिखान करून समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन सहशिक्षक पि. पी. पवनेकर यांनी केले.
समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथे पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सहशिक्षक पवनेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्माननगर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव तथा संस्थेचे संचालक प्रदीप देशमुख, देविदास डांगे, लक्ष्मण कांबळे, बाजीराव पाटील गायकवाड, लक्ष्मण भिसे, देवानंद भिसे, राजीव अंबेकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा पेन , नोटबुक, पुष्पमाला देऊन सत्कार करून दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार देविदास डांगे यांनी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता अभ्यासात लक्ष द्यावे.