हिमायतनगर। तालुक्यातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव मंदिर यात्रा महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणुन लेझीम स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या यात्रा कमिटीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे उदगार लेझीम स्पर्धेचे उद्घाटक श्री.केशव मेकाले यांनी केले.
पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव मंदिराची यात्रा अनेक वर्षापासून सुरू असुन नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या अभिषेक सोहळा थाटामाटात साजरा करण्यात असुन यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. महाप्रसादासह लेझीम स्पर्धा, संगीत भजनाचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सदरील लेझीम स्पर्धेत एकुण ५ संघांनी सहभाग नोंदविला होता. लेझीम स्पर्धेच्या सहभागी संघांनी समाजोपयोगी विवीध देखाव्यातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. लेझीम स्पर्धेचे सरपंच सौ.अनुसयाबाई बळवंत जाधव यांचे पहिले बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडीने पटकावले.
सवना ज. येथील शालेय समितीचे माजी अध्यक्ष सोनबा अनगुलवार यांचे दुसरे बक्षीस जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सवना ज. ने प्राप्त केले. कु.भाविका परशुराम विठ्ठलवाड यांचे तिसरे बक्षीस कै.शेषेराव चांदराव राऊत अनुदानित आश्रम शाळा महादापुर जिरोणा यांनी मिळविले, प्रोत्साहनपर बक्षीस गुरुकुल इंग्लीश स्कुल हिमायतनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसी ता.किनवट यांनी प्राप्त केले. सदरील स्पर्धेचे परीक्षण म्हणुन सेवानिवृत्त शिक्षक गणेशराव कापसे व पदवीधर शिक्षक हावगिराव पाटील यांनी केले.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष कामनराव वानखेडे, सत्यवृत्त ढोले, नागोराव बुरकुले, सचिव गणेशराव भुसाळे, सहसचिव प्रकाशदादा जाधव, अनंता बोलसटवार, गोविंद काळे, कोषाध्यक्ष गुणाजी धावजी आडे, कोषाध्यक्ष वामनराव जाधव, तुकाराम आडबलवाड, मारोतराव अक्कलवाड, मु.अ.जी.एम. वानखेडे, एस.बी.शिरगिरे, सहशिक्षक सर्वश्री आर.एन.जाधव, साहेबराव बोबडे, एम.एम.कांगणे, एस.एन.वाठोरे, सिद्धार्थ राऊत, संकुरवार आडेलू भाटे, अक्षय राठोड, उत्तमराव बुद्धेवाड, सोनबा अनगुलवार, दत्ता काळे, संदिप भुसाळे योगेश अनगुलवार, शिवराज गायकवाड, प्रदीप बिरकलवार दिगंबर अनगुलवार, शिवाजी गोपेवाड, यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी परिसरातील सरपंच, उपसरपंच भाविक उपस्थित होते. महाप्रसादासाठी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले.