श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूरच्या जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे व शीतल भवरे यांच्या संकल्पनेतून एक मूठ धान्य संकलनातून विद्यार्थ्यांनी अभिनव अशी मदत उभारली आहे. विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य देत जवळपास ८ क्विंटलचा धान्यसाठा वृद्धाश्रम करीता मदतीसाठी उभारला. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे तालुका भरात कौतुक होत आहे.
नवीन वर्षाचे औचित्य साधून शहरातल्या जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक मूठ धान्य संकलन हा उपक्रम राबवून अनाथ निराधार वृद्धाना मदत करण्याचा संकल्प केला. २ जानेवारी ते ४ जानेवारी पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक ,विद्यार्थी व पालकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले.
गहू, ज्वारी, तांदूळ, तुर दाळ, चना दाळ याप्रमाणे शाळेतील यल.के.जी ते बारावी च्या विद्यार्थीनी एकत्रित अंदाजे ८ क्विंटल धान्य संकलित केले, व दि ५ जानेवारी रोजी ९ वि १० वि च्या विद्यार्थीना सोबत घेउन,विद्याथ्यांनी सामाजिक जाणीवेतून केलेल्या ही मदत आर्णी जि, यवतमाळ येथील स्व. मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमला मदतीचा हात म्हणून देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये सदर संकलित केलेले धान्य, शाहू फाउंडेशन च्या वतीने ५ हजार रुपये रोख रक्कम, सर्व वृद्धांना केळी,झेंडू बाम व विद्यार्थ्यांकडून चॉकलेट्स वृद्धाश्रम संचालक खुशाल नागपुरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
वृद्ध सेवा हीच ईश्वरसेवा म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या.वृद्धाश्रमात नेऊन आम्हाला वृद्धांच्या अडचणी व भावना समजून घेण्याची संधी जिनियस किड्स स्कूलचे अध्यक्ष भाग्यवान भवरे सर यांनी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी सरांचे आभार मानले! या याप्रसंगी .सचिव शितल भवरे.उपमुख्याध्यापक आहेफाज.वैभव मुडाणकर, आकाश राठोड.शुभम भवरे.सौ,अश्विनी भास्करवार , राजू गुल्फुलवार ,नंदा दातीर, परीहार, कुंभारे, रचना निळे.चंचल भवरे.साबळे.नागेश महल्ले.अनिल भाऊ विकास भाऊ, स्वाती ताई, संगीता सोनवणे ताई, संगीता डहाळे ताई ,लक्ष्मी ताई शांताताई,नववी व दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्तिथ होते.