हिमायतनगर| येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदीर संस्थान तर्फे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत उपस्थित सर्वाचा सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर ( वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचं पार्श्वभूमीवर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या संकल्पनेतून यावर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर व ग्रामीण भागातील पत्रकाराचा सन्मान सोहळयाचे आयोजन दिनांक ०६ सोमवारी सायंकाळी ५ वाजता श्री परमेश्वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, यात्रा कमेटीचे अध्यक्ष सुभाष शिंदे, संचालक तथा डिजिटल मीडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल मादसवार, संचालक संजय माने, संचालक विलास वानखेडे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन चायल आदींची उपस्थिती होती.
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक अगुलवार यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थितांना सध्याची पत्रकारिता व यात होणारे बदल, समाजासाठी पत्रकारांनी कसे काम करावे, यासह आपल्या परिसराच्या विकासातर पत्रकारांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर मंदिर कमिटीच्या वतीने जेष्ठ पत्रकार अशोक अगुलवार, प्रकाश जैन, सोपान बोम्पीलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड आदींसह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा टॉवेल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्वाना फराळाचे वितरण करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पत्रकारांचा सन्मान मंदिर कमिटीने केल्याबद्दल जेष्ठ पत्रकार शुद्धोधन हनवते यांनी मंदिर कमिटीचे आभार मानले.
यावेळी मन्नान भाई, अनिल भोरे, दिलीप शिंदे, वसंत राठोड, पाशा खतीब, सुभाष गुंडेकर, मनोज पाटील, मारोती वाडेकर, फाहद खान, संजय कवडे, नागेश शिंदे, धोंडोपंत बनसोडे, गंगाधर गायकवाड, विष्णू जाधव,आनंद जळपते, दाऊजी गाडगेवाड, अभिषेक बक्केवाड, नागोराव शिंदे, विजय वाठोरे, देवानंद गुंडेकर, माधव काईतवाड, राम चिंतलवाड, संदीप कोमावार, माधव कदम, मोजमिल भाई, अंगद सुरोशे, प्रशांत राहुलवाड, नागसेन गोखले, अनिल नाईक, दुर्गेश मंडोजवार, आदींसह शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.