Martyr Sachin yadavrao vananje ; शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या पार्थिवावर देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
देगलूर,नांदेड। जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात वीरमरण आलेल्या देगलूर तालुक्यातील तमलूर येथील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे वय २९ या वीर जवनाच्या पार्थिवावर शुक्रवारी देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर जवळील तंगधार येथे जात असताना सैन्य दलाचे वाहन कोसळून शहीद सचिन वनंजे यांच्या वाहनाला दिनांक ६ मे रोजी अपघात झाला होता. या दुर्घटनेत तब्बल ८ हजार फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचे हे वाहन कोसळले होते. कुपवाडमध्ये पाकिस्तान सीमेलगत बालाकोट तंगधार ही पोस्ट आहे. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. शहीद सचिन वनंजे यांना ८ महिन्याची एक मुलगी आहे. त्यांचे लग्न २०२२ मध्ये झाले होते.
देगलूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आ. जितेश अंतापूरकर, आ. प्रता...
