नांदेडमराठवाडामहाराष्ट्र

Marathwada ; मराठवाड्यातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करा, निवेदनाद्वारे मागणी

नांदेड l आदिवासी कोळी समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य कोळी महादेव जमातीचे वतीने मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे व नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे, मागणी करण्यात आली असून मराठवाड्यातील महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट लागु करून मराठा कुणबी प्रमाणपत्र शासन निर्णय काढला आहे तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व मल्हार कोळी जमातीसाठी लागु करावा व समाजावर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात,15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा (निजाम राज्य) भारतामध्ये समाविष्ट झाला, दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी सखाराम सुकदेव बि-हाडे व कार्यकारिणी सदस्य यांनी केली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर्वतरांगा, नळदुर्गचा भाग, गोदावरी नदीचा दक्षिण भाग असा स्पष्ट समावेश निजाम गॅजेटमध्ये आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला नुकतेच हैद्राबादचे गॅजेट लागू केले आहे.

गेल्या 30 ते 35 वर्षापासून मराठवाड्यातील कोळी महादेव व मल्हार कोळी या समाजाकडून हैद्राबाद गॅझेट, निजामांच्या अधिपत्याखालील जाती आणि जमाती लेखक सय्यद सिराज उल हसन (निजामच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपैकी एक, १९२०) भारताची जनगणना १९२१, खंड २१ हैदराबाद राज्य. लेखक: मोहम्मद रेहमतुल्लब.हैद्राबादचे लोक लेखक र.मु. जोशी (1954) सर्व शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन केले असता कोळी महादेव व कोळी मल्हार या जामातीचे मुळ वस्तीस्थान हे तत्कालीन हैदराबाद (निजाम ) राज्यातील म्हणजेच आताच्या मराठवाड्यातील बालाघाट-महादेव व अजिंठा डोंगर रांगा असल्याचे सिध्द होते. तसेच हैद्राबाद राज्यात म्हणजेच आताच्या मराठवाउळ्‌यात कोळी ही मुख्य जमात अंतर्गत कोळी महादेव व कोळी मल्हार या दोन जमाती आढळतात असा स्पष्ट उल्लेख आहे.

या निवेदनाद्वारे मराठवाड्यातील कोळी समाजाला, कोळी जमातीसाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करुन जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अमलबजावणी करावी.मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी मल्हार या जमातीच्या 1950 पूर्वीच्या नोंदी कोळी आहेत. आदिवासी क्षेत्रात (TSP) व आदिवासी क्षेत्राबाहेरील (OTSP) जमातीच्या नोंदी कोळीच आहेत. म्हणून 1950 पूर्वीच्या नोंदी कोळी असल्याचा हा पुरावा ग्राह्य धरण्याबात शासन परिपत्रक काढण्यात यावे. प्रवेश निर्गम उतारा, टी.सी 36 व 36 अ च्या महसूली नोंदीचा पुरावा ग्राह्य धरुन जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.

अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय जातीसाठी रक्त नात्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्या धर्तीवर अनुसूचित जमातीचे रक्त नात्याचे परिपत्रक काढून वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा,अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देताना जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय अधिकाऱ्याकडून 1950 वर्षापूवीचा महसूली पुरावा व रक्त नात्यातील जात वैधता सरसकट मागितली जाते. याबाबत असा आग्रह धरु नये म्हणून काढलेल्या शासन परिपत्रकाची अमलबजावणी करावी.

मराठवाड्यातील महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी, मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला आहे. तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीसाठी लागू करण्यात यावा व समाजावर होणाऱ्या अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली ,यावेळी के.ना. जेठेवाड,मराठवाडा उपाध्यक्ष समनव्यक आनंद रेजितवाड व समाज बांधव यांची उपस्थिती होती

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!