HomeकरियरEfficiency of Finance Department : वित्त विभागाची कार्यक्षमता; शिक्षकांच्या जीपीएफ विवरणपत्रांचे वेळेपूर्वी...

Efficiency of Finance Department : वित्त विभागाची कार्यक्षमता; शिक्षकांच्या जीपीएफ विवरणपत्रांचे वेळेपूर्वी वितरण

नांदेड| जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी (GPF) खात्याचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र विहित वेळेपूर्वीच वितरित करण्यात आले असून, यामुळे शिक्षकांत समाधानाचे वातावरण आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांच्या हस्ते सदर विवरणपत्र प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आले. सामान्यतः जीपीएफ विवरणपत्र वितरित करण्याची अंतिम मुदत ३० जून असते. मात्र यंदा वित्त विभागाच्या कार्यक्षमतेमुळे ही प्रक्रिया नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण करण्यात आली आहे. विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने zpngpf.in या संकेतस्थळावर शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपले आधार क्रमांक लिंक केलेले मोबाईल नंबर व आवश्यक माहिती वित्त विभागात सादर करावी, असे आवाहन उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल हिवरे यांनी केले आहे.

वितरण प्रक्रियेत कनिष्ठ लेखाधिकारी स्वाती जोंधळे, अभिजीत कांबळे, प्रफुल्ल शिंदे, पंकज पाईकराव, संतोष पाटनूरकर, कुंबळे, श्रीमती मठपती, चिद्रावार, होंडाळकर, वाघमारे यांनी महत्वाचे योगदान दिले. वित्त विभागाच्या या वेळेवर केलेल्या कार्यवाहीबद्दल विविध शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त करत वित्त विभागाचे आभार मानले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments