HomeनांदेडThe bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात...

The bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले -NNL

भोकर, गंगाधर पडवळे| सुधा नदीच्या पात्रात दोन तरुण पोहायला गेला होते तेव्हा पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहून गेले होते. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह काल सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेत असताना आज दि. ५ सप्टेंबर रोजी मिळाला असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली आहे.

दिनांक ३ सप्टेंबर रोजी मोजे रेनापुर येथील दोन तरुण नामे श्रीनिवास भरत मुळेकर वय २० वर्षे व यश संदीप भगत वय २१ वर्ष हे सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोन्ही युवक दुपारी दोनच्या सुमारास नदी पात्रातून पोहताना वाहून गेले होते. तेव्हा भोकरच्या प्रशासनाने व गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली होती परंतु रात्रभर शोध घेऊनही त्यांची काहच माहिती मिळाली नव्हते.

अखेर दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी त्यातील एक तरुण श्रीनिवास भरत मुळेकर याचा मृतदेह कोळगाव खु.च्या शिवारात सापडला असुन हा मृतदेह काढण्यासाठी बाबाराव टोकलवाड, बालाजी गाडेवाड,विठ्ठल टोकलवाड रा. कोळगाव खु. येथील भोई पथकाने मोलाचे सहकार्य केले.मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे करून मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला होता.तर दुसऱ्या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून मंडळ अधिकारी कंधारे,तलाठी जाधव, ग्रामसेवक भारती,पोलीस कर्मचारी हणवते व गावकऱ्यांच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू होते.

IMG 20240905 WA0033 The bodies of both the youths were found : सुधा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही तरुणाचे मृतदेह सापडले -NNL

दरम्यान SDRF टीम कोळगाव खु. पासून ते कोळगाव बु. पर्यंत आली. आणि भोई पथक रेणापूर पासून कोळगाव बु. कडे शोध घेत असतांना रेणापूर व कोळगाव बु. या मध्यभागी म्हणजे शिवेवर बेपत्ता दुसरा युवक ज्याचे नाव यश संदीप भगत यांचा मृत्यदेह आज गुरुवार दि. ५ सप्टेंबर रोजी ठिक १२ वा.च्या सुमारास सापडला असल्याची माहिती शासनाने दिली आहे. सदरील कारवाईत भोई पथकाने कमाल केली असून, अतिशय किचकट परिस्थितीत हे मृतदेह शोधून काढणे हे काम अतिशय अवघड होते त्यांनी यशस्वी केले.

या पथकात बालाजी पोशट्टी गोडवाड, नागा लक्ष्मण टोपलवाड, बालाजी लक्ष्मण टोपलवाड, पांडूरंग रामजी गादेपवाड, विठ्ठल सायन्ना टोकलवाड, पेंटाजी मारोती गाडेवाड हे होते तर शासनाने SDRF पथकाला ही पचारण करून त्यांनी ही अतिशय मेहनत घेऊन या कामी मदत केली त्यात प्रशांत राठोड PSI , SDRF, धुळे टीम क्र. २ सुधीर शिरसाठ PSI, SDRF,अधिकारी -2,अंमलदार – 15 यांचा समावेश होता. तर स्थानिक म्हणून प्रभावी यंत्रणा राबविण्यात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ते भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे त्याचं बरोबर मंडळ अधिकारी मनोजकुमार खंदारे, तलाठी रुपेश जाधव, तलाठी ए.एम.सुर्यवंशी, रेणापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विकास भारती, पत्रकार राजेश चंद्रे,सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड ,पो. हे.का. राजेश्वर कळणे,होमगार्ड गजानन सिद्धेश्वर,आनंद चव्हाण, गावचे पोलीस पाटील श्रीराम सुर्यवंशी , बालाजी पांचाळ पोलीस पाटील कोळगाव बु, बालाजी चिंतावार पोलीस पाटील कोळगाव खु. यासह अनेक गावकरी, नातलग यांची मदत लाभली.

काल श्रीनिवास मुळेकर तर आज यश भगत यांचावर उत्तरीय तपासणी करून अतिशय दुःखद वातावरणात रेणापूर येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. एकाच वेळी दोन्ही कुटूंबातील एकुलते एक तरुण मुलं गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या पुरातून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच आपली गुरेढोर सुद्धा पुरातून नेण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना वारंवार सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments