Wednesday, May 13

BJP leader Dilip Kandakurte’s crop inspection : भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांची आंबेसांगवी पळशी शेवडी भागात पीक पाहणी -NNL

लोहा| नांदेड दक्षिण मतदार संघात दोन वेळा अल्पसा मतांनी पराभूत झालेले भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी। सोनखेड सर्कल मधील आंबेसांगवी ,भेंडेगाव पळशी सोनखेड, शेवंडी या भागात पिकांच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागांची गेल्या दोन दिवसा पासून पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांनी गेल्या दहा वर्षा पासून सोनखेड सर्कल मधील गावात लोकांच्या मदतीला जाऊन जात आहेत. मागील दोन्ही निवडणुकीत अल्पसा मतांनी पराभूत व्हावे लागले तरीही त्यांनी या भागातील जनसंपर्क कमी होऊ दिला नाही लोकांच्या मदतीला धावून जातात.

IMG 20240905 WA0029 BJP leader Dilip Kandakurte's crop inspection : भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते यांची आंबेसांगवी पळशी शेवडी भागात पीक पाहणी -NNL

अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसा पासून ते सोनखेड सर्कल मध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत आहेतआंबेसाघवी गावातील नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या प्रकाश पाटील सावंत, जानकीराम उमरेकर यांच्या शेतातील तिवृष्टीमुळे झालेला शेतांची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी राम सावंत,सुदाम उमरेकर चेअरमन, कोंडीबा कदम, दयानंद डुबे,गंगाधर डुबे,स्वपनील गव्हाने,शत्रुघन सावंत, राम पाटील कदम, संभाजी कदम, कल्याण सावंत, सचिन कदम उपस्थित होते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!