श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे ग्रा.प. लखनापूर ता. माहूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सदरील पाणी पुरवठा योजनेचे बंद असलेले काम तात्काळ सुरु करून काम पूर्ण करवे व झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. सदर कामाची चौकशी करून संबधित अभियंता व कंत्राटदार यांचे विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करवी अन्यथा नागरिकांच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल अशा अशयाचे निवेदन अरविंद नुरसिंग राठोड, अमोल लक्ष्मण राठोड यांनी गटविकास अधिकारी पस माहूर यांना दिले आहे.


ग्रामपंचायत लखमापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरु करण्यात आले असून सदरील काम अद्याप पर्यंत अपूर्ण स्थितीत आहे. ज्यामध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम मे २०२५ सूरु केले परंतु सुरुवातीस क्युरिंग करण्यात आली नाही. विहिरीचे बांधकाम, गाव व तांड्यातील अंतर्गत पाईपलाईनचे काम, आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे सदर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. तसेच जगू नाईक तांडा व लखमापूर गाव व तांडा येथे पाईपलाईन साठी खोदकाम करून ठेवलेले रस्ते अद्याप पर्यंत मेकअप केले नाहीत. संबधित कंत्राटदार व अभियंता यांनी सदरील पाणी पुरवठा योजनेच्या कामाकडे फिरकून सुद्धा पहिले नाही.



योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सदरील पाणी पुरवठा योजनेचे सध्या बंद असलेले काम तात्काळ सुरु करून काम पूर्ण करणे व झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सदर कामाची चौकशी करून संबधित अभियंता व कंत्राटदार यांचे विरुद्ध दडात्मक व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी अरविंद नुरसिंग राठोड, अमोल लक्ष्मण राठोड रा. जगू नाईक तांडा यांनी निवेदन द्वारे केली असून त्याच्या प्रतीलिपी -जिल्हाधिकारी नांदेड. सहाय्यक जिल्हाधिकारी,किनवट तहसीलदार माहूर कार्यकारी अभियंता जि.प. पाणीपुरवठा विभाग नांदेड, .उप अभियंता जी.प. पाणीपुरवठा बांधकाम विभाग कार्यालय किनवट माहूर यांना दिले आहे.




