नांदेड| सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या वतीने भव्य संगीत रजनी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. श्रीजया अशोकराव चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने चारचाँद लागले.


शुक्रवारी श्रीराम सेतु गोवर्धन घाट पुलाजवळ, डॉ. संतोष यादव यांच्या क्लिनिकसमोर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर दुपारी चार वाजता महाप्रसाद कार्यक्रमाची सुरुवात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीय, मुन्नासिंह तेहरा, व धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.


भक्तांसाठी स्वादिष्ट मसाला चण्याचा महाप्रसाद रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाटप करण्यात आला. यादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी विविध दुर्गादेवी मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.सुरेश लोट यांनी आ. श्रीजया चव्हाण यांचा साईबाबाची आकर्षक संगमरवरी मूर्ती, शाल, मानाचा फेटा व पुष्पहार देऊन गौरव केला.


या कार्यक्रमाला डॉ. सचिन उमरेकर, भाजप सरचिटणीस विजय येवणकर, शितल खांडील, सुषमा थोरात, नागनाथ गड्डम, श्रीकांत बाहेती, बागड्या यादव, अभिषेक सौदे, प्राचार्य शिवनीकर, गुरुदीपसिंघ संधू, संतोष परळीकर, रूपेंद्रसिंग साहू, ओमप्रकाश तापडिया, सुरेश पळशीकर, कैलास महाराज वैष्णव, गोपाळराव मळगे, दीपकसिंह ठाकूर, गिरीश भंडारी, चंचलसिंह जट आदी मान्यवर उपस्थित होते.महिला पदाधिकारी अर्चना शर्मा व प्रगती नीलपत्रेवार यांनी महिलांची ओटी भरून शुभेच्छा दिल्या.



रागिनी जोशी यांच्या संगीत संचाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. मिरवणुकीतील महिलांनी या गीतांवर मनसोक्त नृत्य करून आनंद लुटला. उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या महिला व मुलींना सुरेश लोट यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन दिलीप ठाकूर यांनी केले, तर शिवा लोट यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा लोट, सुरेश शर्मा, अरुण काबरा, शिवचरण लोट, सुनील रामदासी, नरेश लोट, कैलास कुंटूरकर, महादू शिंदे (डेरला सरपंच), रोहित लोट, रामजी भोकरे, शुभम पवार, सौरभ मचलू यांनी परिश्रम घेतले.


