CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 412 थकबाकी मालमत्ता धारकांनी भरले एक कोटी रूपये

IMG 20250914 WA0005 CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 412 थकबाकी मालमत्ता धारकांनी भरले एक कोटी रूपये

नवीन नांदेड l नावामनपाच्या वतीने आयोजित लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील जवळपास 465 मालमत्ता धारकांनी एक कोटी रुपये नगदी,धनादेश,
आँनलाईन रक्कम व्दारे एकुण मालमत्ता कर जमा झाला असुन, मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे व उपायुक्त अजितपाल सिंग संधू यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग,कर निरीक्षक,वसुली लिपीक व कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे,सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय आजचा वसुली मध्ये दोन नंबरवर आले आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या वतीने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील 2314 मालमत्ता धारका कडील थकबाकी असणाऱ्या 50 हजारावरील थकबाकी मालमत्ता 13 सप्टेंबर रोजी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका मुख्यालयात होणाऱ्या लोक अदालतीसाठी थकीत मालमत्ता धारकांना वसुली लिपीक यांच्या मार्फत नोटीसा देण्यात आल्या होत्या ,तर थकीत मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ . मिर्झा बेग यांनी केले होते.

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मध्ये एकुण मालमत्ता धारक जवळपास 28 हजार असुन मालमत्ता करापोटी थकीत मालमत्ता कर व चालू वर्षीच्या मालमत्ता करापोटी थकबीकादार मालमत्ता धारकांना मनपा प्रशासन यांच्या वतीने नावा मनपाच्या मुख्यालय 13 सप्टेंबर रोजी थकीत मालमत्ता करा संदर्भात संबंधित थकबाकीदार असलेल्या मालमत्ता कर धारकासाठी लोक अदालत ठेवण्यात आली असून यात मालमत्ता धारकांना थकीत बाकी रक्कम भरण्यासाठी आपले म्हणणे मांडुन कर भरता येणार आहे, विशेष म्हणजे 13 सप्टेंबर साठी मालमत्ता थकीत बाकी वर 80 टक्के सुट देण्यात आली होती.

मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर उपायुक्त अजितपाल संधु ,यांच्या मार्गदर्शना खाली सिडको क्षेत्रीय कार्यालय वाघाळा सहाय्यक आयुक्त डॉ, मिर्झा बेग कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी कार्यालय अंतर्गत 2314 मालमत्ता धारकांना कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग,सादुल्ला खान,वसंत कल्याणकर यांच्या मार्फत,वसुली लिपीक मालु एनफळे,विवेकानंद लोखंडे,ऊतम जोंधळे,नथुराम चवरे, रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,राहुल पाईकराव,रमेश यशवंतकर,दिपक जोंधळे,यांनी वाटप केले होते,13 सप्टेंबर रोजी झालेल्या लोक अदालत अंतर्गत जवळपास 465 मालमत्ता धारकांनी सहभागी होत जवळपास एक कोटी मालमत्ता कर भरला आहे.
मनपाच्या ईतर सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर वसुली मध्ये हे कार्यालय दोन वर आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top