CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 412 थकबाकी मालमत्ता धारकांनी भरले एक कोटी रूपये
नवीन नांदेड l नावामनपाच्या वतीने आयोजित लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील जवळपास 465 मालमत्ता धारकांनी एक कोटी रुपये नगदी,धनादेश,
आँनलाईन रक्कम व्दारे एकुण मालमत्ता कर जमा झाला असुन, मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे व उपायुक्त अजितपाल सिंग संधू यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग,कर निरीक्षक,वसुली लिपीक व कर्मचारी यांच्ये अभिनंदन केले आहे,सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय आजचा वसुली मध्ये दोन नंबरवर आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा न्यायालय नांदेड यांच्या वतीने नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील 2314 मालमत्ता धारका कडील थकबाकी असणाऱ्या 50 हजारावरील थकबाकी मालमत्ता 13 सप्टेंबर रोजी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका मुख्यालयात होणाऱ्या लोक अदालतीसाठी...
