Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Ek ped ma ke naam : “एक पेड मा के नाम” उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे वेगळेपण — तळेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Ek ped ma ke naam : “एक पेड मा के नाम” उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे वेगळेपण — तळेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

नांदेड, करियर
नांदेड| दिनांक ३० जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तळेगाव, केंद्र तामसा, तालुका हदगाव जी. नांदेड येथे शालेय विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ ईळेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त "पेड मा के नाम" हा आगळावेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. तळेगाव हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकाचे अग्रगण्य गाव असून हीच शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणारी शाळा आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक वाडकर, सूर्यवंशी, बोईनवाड, मोकले तसेच शिक्षिका शिराढोणकर, कानडखेडकर, मुळावकर, जोशी, शेंडे, पाटील, गोपलवार, स्वामी, सावंत, राठोड, कल्याणकर व शाळेचे मुख्याध्यापक नागनाथराव ईळगावे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल नवले, देवानंद हुंडेकर यांचा ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव मुंडकर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, बि...
Details announced : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या निकालासह विविध तपशील जाहीर

Details announced : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या निकालासह विविध तपशील जाहीर

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 29 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै व बारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार 30 जुलै ते शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून इ. 10 वी व 12 वी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय म...
Bike trolley experiment : पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या गोदाकाठच्या गुंज शाळेतील गुरुजीचा बाईक ट्रॉलीचा प्रयोग

Bike trolley experiment : पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या गोदाकाठच्या गुंज शाळेतील गुरुजीचा बाईक ट्रॉलीचा प्रयोग

करियर, नांदेड
लोहा l जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा कारणाने शाळा बंद होणार ही भीती ग्रामस्थांना वाटत असते .अशीच अवस्था गोदाकाठी असलेल्या पालम तालुक्यातील गुंज या गावाची झाली होती .गाव उठले आणि दोन ठिकाणी जाऊन बसले.,पण शाळा जुन्याच गावात राहिली.पण विद्यार्थी मात्र अन्यत्र जाऊ लागले.पटसंख्या अभावी शाळा बंद पडणार अशी परिस्थिती उदभवली पण उपक्रमशील शिक्षक लोह्याचे भूमिपुत्र सुनील राऊत त्याचे सहकारी रुस्तुम लोखंडे यांनी ग्रामस्थानच्या मदतीने जुगाड करत बाईक ट्रॉली आणली आणि दररोज विस्तारीत गावातून विद्यार्थी ने -आण करत आहेत. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला. ग्रामस्थ व गुरुजींच्या इच्छाशक्तीतून गावातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली पालम (जि परभणी, ) तालुक्यातील गुंज हे गाव गोदावरी नदी काठी आहे. कडेला वसलेलं हे गाव सधन बारमाही ओलिताखाली आलेलं . जु...

Dilip Thakur : “नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार” दिलीप ठाकूर याना जाहीर

नांदेड, करियर
नांदेड| स्वा. सावरकर जयंती महोत्सवानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड संचलित स्वा. सावरकर अध्यासन केंद्र यांच्या वतीने 29 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता कुसुम सभागृह येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांच्या अध्यक्षतेखाली "नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार" वितरण करण्यात येणार असून दिलीप ठाकूर यांचा १०२ वा पुरस्कार आहे. या वर्षी पासून देण्यात येणाऱ्या "नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार" धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर (स्वा. सावरकर विचारप्रवर्तक व लेखक),डॉ. मालपाणी संतोष (मधुमेह तज्ञ),डॉ. मल्हार लाटकर (आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संशोधक),डॉ. मुकुंद करंबेळकर (स्त्रीरोगतज्ञ व ज्येष्ठ नाट्यकलावंत) यांना गौरविण्यात येणार आहे. हा गौरव म्हणजे समाजहितासाठी कार्यरत राहणाऱ्या विचारवंताच्या कार्याची एक सार्वजनिक मान्यता आहे.धर्मभ...
Journalists Association : राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिवपदी चंद्रकांत वाघमारे

Journalists Association : राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिवपदी चंद्रकांत वाघमारे

करियर, नांदेड
लोहा| येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण संवाद बैठक संपन्न झाली. या बैठकीचे आयोजक , ऊपसंपादक तथा पत्रकार चंद्रकांत वाघमारे, पत्रकार बाळासाहेब बुद्धे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश प्रदेश सचिव शेख मकबुल अहेमद, अँडव्होकेट गणेश बिनगे, ईरशाद पठाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्वरित जिल्हा कार्यकारिणीची कंधार व लोहा तालुका कार्यकारिणीची तसेच राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत जेष्ठ पत्रकार बालाजी धनसरे यांची महाराष्ट्र राज्य बहुभाषिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मा.श्री. लक्ष्मीकांत कस्तुरे यांनी केली या विशेष बैठकीमध्ये नियुक्तीपत्र प्रधान करण्यात आले. ...
Sanjay Neelpatrewar  : संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान

Sanjay Neelpatrewar : संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान

नांदेड, करियर
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर तालुका कंधार येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी गुन्हे निर्गती मध्ये उत्कृष्ट कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल श्री मा. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते संजय नीलपत्रेवार यांचा यशोचित सत्कार, सन्मान करून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उस्माननगर पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक नीलपत्रेवार यांनी मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिक पोलीस दलात सेवा बजावली असून अनेक जटिल गुन्हे त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात यशस्वी कर्तव्य बजावले आहे. पोलीस स्टेशन उस्माननगर येथे माहे जून २०२५ महिन्यात सर्व गुन्हे एकूण ५८ निर्गती करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी अविरत दिलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी नांदेड पोलीस दलाच्या वतीने त्यां...
Victory Day : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा

Victory Day : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा

करियर, नांदेड
नांदेड| भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. तथापि भारतीय स्वराष्ट्राच्या संकल्पनेला विसरले नाहीत. अनेक योध्दे, क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या संकल्पनेसाठी लढा दिला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. 26 जुलै हा विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 26 जुलै रोजी विजय दिन साजरा करण्यात आला. विजय दिनानिमीत्त माजी सुभेदार गोविंद शेवाळकर, लक्ष्मण विश्वास, सखाराम जोशी तसेच विरांगणा श्रीमती सरोजनी शिनगार पुतळे, श्रीमती शितल कदम य...
Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

करियर, नांदेड
लोहा| शालेय जीवनात शिस्त आणि संस्कार याचे धडे शाळेत दिले जातात. आयुष्यात त्याचा फायदा होतो आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. शालेय शिक्षणात वाचनाची सवय लागली तर निश्चितच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल असे मार्गदर्शन कंधार पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप (Deputy Superintendent of Police Dr. Ashwini Jagtap) यांनी केले. जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे भार्गव अकॅडमी लोहा शहरात सुरू झाली. त्यामुळे शहराच्या शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात पालक पाल्यांच्या शिक्षणासाठी लोहा शहरात येत आहेत. अकॅडमीमुळे नांदेड येथे जाणाऱ्या पालकांना येथेच शिक्षणाची व्यवस्था झाली. घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पोलिस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप याच्या हस्ते या विद्यार्थ्यांना वर्गनिह...
Pandit Dindayal Upadhyay : पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

Pandit Dindayal Upadhyay : पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यशवंत महाविद्यालयात 22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील 190 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 39 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुण्या गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजर्षी ताई पाटील या होत्या. जीवन एक शर्यत असून, या शर्यतीतून अनेक गोष्टीत बदल होत असतात. इथं जी संधी उपलब्ध करुन दिली आहे, त्या संधीचा लाभ सर्व युवक-युवतीनी घ्यावा, असे आवाहन आमदार श्रीजया चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले. शिक्षण घेत असताना गुरुजणांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांच्या विचार करा, आयुष्यात मिळालेल्या संधीच सोन करा असा स...
Comrade Ujjwala Padalwar : कॉम्रेड उज्वला पडलवार यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ पुरस्कार जाहीर

Comrade Ujjwala Padalwar : कॉम्रेड उज्वला पडलवार यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ पुरस्कार जाहीर

करियर, नांदेड
नांदेड| सीटू कामगार चळवळीत सक्रीय भूमिका बजावणाऱ्या कॉम्रेड उज्वला पडलवार यांना यंदाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील व साहित्यरत्न कॉ.अण्णाभाऊ साठे जयंती तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ दिला जातो. यंदा नांदेड जिल्ह्यातून कामगार हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या उज्वला पडलवार यांची निवड करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी बीड येथील एका विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे भाई मोहन गुंड व अशोक रोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी आशा वर्कर्स, गटप्रवर्तकताई, अंगणवाडी सेविका, घरकामगार महिला, असंघटित कामगार अशा विविध कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न ...
error: Content is protected !!