Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Sahebrao Raut ; महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडकोच्या मुख्याध्यापक पदी साहेबराव राऊत

Sahebrao Raut ; महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडकोच्या मुख्याध्यापक पदी साहेबराव राऊत

नांदेड, करियर
 नवीन नांदेड l सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडको मुख्याध्यापक पदी साहेबराव विठ्ठलराव राऊत यांच्यी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे, नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय कानवटे हे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी शाळेतील जेष्ठ व कर्तव्यदक्ष, व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या साहेबराव विठ्ठलराव राऊत यांच्यी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव व कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव यांनी 1 ऑगस्ट रोजी नियुक्ती पत्राव्दारे केली आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय कानवटे यांच्या कडून नवनिर्वाचित मुख्याध्यापक साहेबराव राऊत यांनी पदभार स्वीकारला आहे. सदरील निवडीबद्दल शाळेतील श्रीमती मामीडवार एस.एल, घ...
CIDCO ; इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोच्या पर्यवेक्षकपदी डॉ. आण्णासाहेब गरड

CIDCO ; इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोच्या पर्यवेक्षकपदी डॉ. आण्णासाहेब गरड

नांदेड, करियर
नवीन नांदेड l शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे जेष्ठ शिक्षक डॉ. आण्णासाहेब गरड यांना इंदिरा गांधी हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. डॉ.आण्णासाहेब गरड यांनी इंदिरा गांधी हायस्कूल येथे जवळपास एकोणतीस वर्ष भूगोल विषयाचे अध्यापन केले तर डॉक्टरेट च्या माध्यमातून भूगोल या विषयात नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात साखर कारखान्यांची भूमिका एक भौगोलिक अभ्यास वर सखोल समजपयोगी संशोधन केले आहे. डॉ.गरड इतर शैक्षणिक संशोधन व नियुक्त्या खालील प्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ पुणेच्या महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण NEP-2020 निर्मिती सदस्य,( इयत्ता तिसरी ते बारावी), महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्य (इयत्ता नववी ते बारावी), दीक्षा ॲपचे समिक्षण, आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य, शिक्षक प्रशिक्षण क...
Sagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा

Sagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा

नांदेड, करियर
नवीन नांदेड l एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून “स्थापत्य व जलव्यास्थापन अभियांत्रिकी” ची २०१६ मध्ये पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी सागर नाठे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (यू.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक पटकावून एस.जी.जी.एस. संस्थेचे यश अजून उज्वल केले आहे. त्याच्या रूपाने एस.जी.जी.एस.संस्थेच्या मुकुटात अजून एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यामधील तांत्रिक ज्ञानाची कसोटी लागणाऱ्या वैज्ञानिक (सिव्हिल) गट ‘अ’ परिक्षेत देशात सहावा क्रमांक मिळवणे म्हणजेच त्यांनी केलेल्या परिश्रमाची पावतीच होय. एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड या संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आय.ए.एस., यु.पी.एस.सी., गेट (ग्रॅज्युएट एप्टिट्यूट टेस्ट इन इंजीनियरिंग), मह...
online examination : विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे यशस्वी आयोजन

online examination : विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे यशस्वी आयोजन

नांदेड, करियर
नांदेड| आजच्या स्पर्धेच्या युगात पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम भरती प्रक्रिया राबविणे ही प्रत्येक प्रशासनाची गरज बनली आहे. याच उद्देशाने विविध ८६ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे वर्ग-४ मधील विविध ८६ रिक्त पदांच्या भरतीसाठी २५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून १७,१४६ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते, त्यापैकी ११,८६८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला. परीक्षेसाठी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नांदेड या प्रमुख शहरांतील एकूण ११ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेचे आयोजन अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. प्रत्येक पर...
Degloor News : आधुनिक तंत्रज्ञानाचे न्यू एज कोर्सेस आता देगलूरमध्ये उपलब्ध

Degloor News : आधुनिक तंत्रज्ञानाचे न्यू एज कोर्सेस आता देगलूरमध्ये उपलब्ध

करियर, नांदेड
नांदेड| कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या न्यू एज कोर्सेस योजनेंतर्गत देगलूर येथील अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या नवीन अभ्यासक्रमाची सुरूवात झाली आहे. या कोर्ससाठी एकूण दोन युनिट असून एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर कोर्स आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी देतो. विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी वेळेत नोंदणी करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर, जि. नांदेड यांनी केले आहे....
Abacus ; ९ वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा श्रीक्षेत्र माहूर येथे यशस्वीरित्या संपन्न

Abacus ; ९ वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा श्रीक्षेत्र माहूर येथे यशस्वीरित्या संपन्न

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, लातूर यांच्या वतीने ९ वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा दिनांक २७ जुलै रोजी श्रीक्षेत्र माहूर येथील बालाजी मंगलम येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. परीक्षेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व पदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीचे संचालक संतोषजी लोहारे हे होते. समारंभाचे उद्घाटन माहूर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्रा. डॉ. तुळशीदास गुरनुले, वरिष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी व जयकुमार अडकिणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. योगायोग मेट्रो ब्रेन अबॅकस माहूर चे गुणवंत विद्य...
Rahul kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

Rahul kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

करियर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड
नांदेड| राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आकांक्षित किनवट तालुक्याचे समन्व्यक पांडुरंग मामीडवार यांची उपस्थिती होती....
Annabhau Sathe : साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्रोत – मुख्याध्यापक राहुल सोनसळे

Annabhau Sathe : साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्रोत – मुख्याध्यापक राहुल सोनसळे

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून शोषित, वंचित, श्रमिक वर्गासाठी आवाज उठवला. त्यांचे विचार आजही मोलाचे असून साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्त्रोत असल्याची भावणा मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच राहुल सोनसळे यांनी व्यक्त केली. सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्य जयंती निमित्त व थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी उपसरपंच तथा शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी अण्णाभाऊ - साठे व थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेतील स्वयपाकिन कर्मचाऱी यांची मुलगी शबुर...
Gaurav Puraskar ; “ नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार ” चे वितरण

Gaurav Puraskar ; “ नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार ” चे वितरण

करियर, नांदेड
अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या “ नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार ”चे पहिले पुरस्कारार्थी म्हणून समाजसेवेतील अखंडित योगदानाबद्दल धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना सिनेदिग्दर्शक योगेश सोमण,अ.भा.विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्त जोशी व संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला १०२ पुरस्कार मिळाल्याची पहिल्यांदाच घटना घडल्यामुळे विक्रमवीर ॲड.ठाकूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळवारी नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव या रंगतदार समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा.शेषराव मोरे,संस्थेचे सचिव ॲड.वनिता जोशी,कोषाध्यक्ष कैलासचंद्र काला,सहसचिव धनंजय जोशी,प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.म...
District Collector honored in Nagpur : नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात किनवटचा यशस्वी सहभाग – जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर येथे सन्मान

District Collector honored in Nagpur : नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात किनवटचा यशस्वी सहभाग – जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर येथे सन्मान

नांदेड, करियर, नागपूर
नांदेड, अनिल मादसवार| नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर -...
error: Content is protected !!