HomeकरियरCall for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी...

Call for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड| शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड येथे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 जुलै 2025 हा अंतिम दिनांक आहे. या प्रवेश परीक्षेसाठी पालक, विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले आहे. या जवाहर नवोदय विद्यालयात गरजू व होतकरू हुशार, सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निवड चाचणी प्रवेश परीक्षा द्वारे निवड करण्यात येते. अधिक माहितीसाठी 9926928732, 9977994732 क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ
नांदेड| राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज लवकरात लवकर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चपथ, पुणे-01 यांचेस्तरावर अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments