शिवणी, भोजराज देशमुख। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी खूप सुंदरपणे नियोजन करून बालसभा घेतली निवडक विद्यार्थ्यांची भाषणे यावेळी झाली तसेच स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात , सार्वजनिक ठिकाण, मंदिर परिसर, स्वच्छता मोहीम राबवून शालेय परिसर व गावातील मुख्य रस्ता स्वच्छ केला.
गावातील ग्रामस्थ यांनीही नाली व रस्ता स्वच्छता करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मदत केली.विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व या उपक्रमातून समजण्यास मदत झाली. ‘स्वच्छता कशी चांगली ठेवता येईल. शौचालयाची स्वच्छता नीट झाली पाहिजे, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. गावातील स्वच्छतेचे प्रश्न यावर गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक आवाराचे नियमित स्वच्छता राखली जाईल,’ असे विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी व सरपंच साहेब आश्वासन दिले.
यावेळी सुधाकर जाधव सरपंच, दारासिंग राठोड पोलीस पाटील, सविता चव्हाण अंगणवाडी ताई , विनायक राठोड,दत्ताराम राठोड, रवि राठोड,उत्तम महाराज,भिकू राठोड,शंकर जाधव,यसुधा राठोड,अकोश पवार,मुख्याध्यापक उत्तम कांबळे, शिक्षक ,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी सहशिक्षक दिलीप वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
गोंडजेवलीतांडा शाळेत विविध उपक्रम राबवून उत्तम प्रतिसाद दिला आहे. या निमित्ताने गावागावातून समाजापर्यंत चांगल्या प्रकारचा संदेश आपण दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व स्वच्छता ही सेवा स्वच्छता एक संस्कार विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. यातून गाव शहर राज्य राष्ट्र स्वच्छ होईल आणि नागरिकांचे आरोग्य संवर्धन होईल, असा विश्वास वाटतो. गंगाधर राठोड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती किनवट,संजय कराड शिक्षण विस्तार अधिकारी,कौड सत्यनारायण केंद्र प्रमुख याप्रसंगी आपल्या सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन केले.