HomeकरियरDr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे...

Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

लोहा| शालेय जीवनात शिस्त आणि संस्कार याचे धडे शाळेत दिले जातात. आयुष्यात त्याचा फायदा होतो आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. शालेय शिक्षणात वाचनाची सवय लागली तर निश्चितच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल असे मार्गदर्शन कंधार पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप (Deputy Superintendent of Police Dr. Ashwini Jagtap) यांनी केले.

जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे भार्गव अकॅडमी लोहा शहरात सुरू झाली. त्यामुळे शहराच्या शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात पालक पाल्यांच्या शिक्षणासाठी लोहा शहरात येत आहेत. अकॅडमीमुळे नांदेड येथे जाणाऱ्या पालकांना येथेच शिक्षणाची व्यवस्था झाली. घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पोलिस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप याच्या हस्ते या विद्यार्थ्यांना वर्गनिहाय बक्षिसे देण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करावा. मोबाईल वापरू नये या वयात तुम्हाला त्याची गरज नाही.शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना शिस्त व संस्कार याचे धडे दिले जातात. मोठेपणी त्याचा फायदा होऊन व्यक्तिमत्त्व विकसित होते. असे सांगून भार्गव क्लासेसच्या शैक्षणिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. लोह्यातुन अनेक विद्यार्थी घेण्यास मोठी मदत होईल असा विश्वास डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला. आरंभी अकँडमीचे व्यवस्थापक अजित मोरे, राजकिरण वाकडेयांनी त्याचा सत्कार केला. यावेळी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments