Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिस्ती व संस्कार आत्मसात करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप
लोहा| शालेय जीवनात शिस्त आणि संस्कार याचे धडे शाळेत दिले जातात. आयुष्यात त्याचा फायदा होतो आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. शालेय शिक्षणात वाचनाची सवय लागली तर निश्चितच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल असे मार्गदर्शन कंधार पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप (Deputy Superintendent of Police Dr. Ashwini Jagtap) यांनी केले.
जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविणारे भार्गव अकॅडमी लोहा शहरात सुरू झाली. त्यामुळे शहराच्या शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात पालक पाल्यांच्या शिक्षणासाठी लोहा शहरात येत आहेत. अकॅडमीमुळे नांदेड येथे जाणाऱ्या पालकांना येथेच शिक्षणाची व्यवस्था झाली. घेण्यात आलेल्या परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पोलिस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप याच्या हस्ते या विद्यार्थ्यांना वर्गनिह...
