Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

eco-friendly rakhis : गाईडच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक राख्या 

eco-friendly rakhis : गाईडच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक राख्या 

करियर, नांदेड
नांदेड| बहिण भावाच्या पवित्र बंधनाचा सण रक्षाबंधन शनिवारी ता.९ पारंपारिक पद्धतीने सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्षाबंधन चे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरण पूरक असल्यामुळे या राख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या राख्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, तुकडे, रंग, कापड, कापूस, धान्य तांदूळ, गहू, विविध दाळी, मका, आईस्क्रीमच्या टाकाऊ काड्या, शर्ट चे बटन, टेलरिंगचे उरलेले कापड, अशा विविध वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या आहेत.   नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या गाईडच्या विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, शिक्षक मारुती सोने, शिक्षक मुरलीधर ढगे , शिक्षिका मीनाक्षी गोखंडे, ...
Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना

Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना

Blog, करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलिस स्टेशन च्या कर्तव्यदक्ष, जिद्दी , चाणाक्ष हुशार , मेहनती, व सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/ (सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) या द.आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्...
Vachak Peeth : रविवारी वाचकपीठचा वाचकमेळा अध्यक्षपदी प्राचार्य ठाले पाटील तर उद्घाटक भु द वाडीकर

Vachak Peeth : रविवारी वाचकपीठचा वाचकमेळा अध्यक्षपदी प्राचार्य ठाले पाटील तर उद्घाटक भु द वाडीकर

नांदेड, करियर
नांदेड l मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि वाचकपीठ प्रतिष्ठान अहिल्यानगर , यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या वाचकमेळ्यात रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथे महाराष्ट्रातल्या मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे. तीन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटन , कवितेचे चर्चासत्र आणि निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे. वाचकपीठ ही केवळ कवितेला वाहिलेली संस्था असून नवोदितांमध्ये काव्य जाणिवा समृद्ध करण्याचे काम ही संथा करते. नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील हॉटेल विसावा पॅलेस येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. भू द वाडीकर हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक ...
Veer Parivar Sahayata Yojana : सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”

Veer Parivar Sahayata Yojana : सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”

नांदेड, करियर
नांदेड| सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे. लाभार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे येऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे. सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत “वीर परिवार सहायता योजना-2025” मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवाप्रदान करीत आहे. या योजनेचा उद्देश देशाचे संरक्षण करणारे सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रभावित करणाऱ्या वैयक्तिक आणि नागरी हक्काच्या कायदेशीरबाबींमध्ये सेवा प्रदान करणे आहे. ही योजना सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना मालमत्...
Government Hostel : बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना

Government Hostel : बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना

नांदेड, करियर
नांदेड| जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी.,एम.ए.,एम.एस.सी. अशा बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 17 ऑगस्ट 2025 पर्यंत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू आहे. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन संदर्भात 13 सप्टेंबर रोजी लोकअदालत नांदेड प्रादेशिक परिव...
Nanded Metropolitan Journalists : नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

Nanded Metropolitan Journalists : नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

करियर, नांदेड
नांदेड| मराठी पत्रकारितेची अस्मिता आणि कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र संगनवार (Ravindra Sanganwar) यांची तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे (Gajanan Kanade) यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त देशमुख यांच्या नेतृत्वात सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी ही निवड जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वस्त किरण नाईक , विश्वस्त शरद पाबळे , परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर , कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख, कार्याध्यक्ष शिवराज काटकर , सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे , उपाध्यक्ष प्रकाश कांबळे , विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे आणि डिजिटल मीडियाचे प्...
Annabhau Sathe- Lokmanya Tilak ; अण्णाभाऊ साठे- लोकमान्य टिळक प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते -प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांचे प्रतिपादन

Annabhau Sathe- Lokmanya Tilak ; अण्णाभाऊ साठे- लोकमान्य टिळक प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते -प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांचे प्रतिपादन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्राच्या मराठी साहित्य परंपरेतील एक महत्त्वाचे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी मार्क्सवादी विचाराचा अंगीकार करून वास्तववादी लेखन केले. आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित आणि प्रवाह पतितांच्या व्यथा आणि वेदना साकार केल्या आणि मानवतावादी विचारांशी प्रामाणिक राहिले तर प्रखर राष्ट्रवादी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अमूल्य योगदान देऊन प्रखर क्रांतिकारी लढा उभारला. त्यामुळे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक हे प्रखर मानवतावाद आणि राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होत,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात केले. येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित्त अभिवादन...
Vighapith : चार जमीनग्रस्त पाल्याचे विघापिठ सेवेत सामावून घेण्यासाठी विघापिठ समोर आमरण उपोषण

Vighapith : चार जमीनग्रस्त पाल्याचे विघापिठ सेवेत सामावून घेण्यासाठी विघापिठ समोर आमरण उपोषण

नांदेड, करियर
नवीन नांदेड l चार जमीनग्रस्त पाल्याने स्वारातीम विघापिठ सेवेत तात्काळ सेवेत रुजू करून घेवून न्याय द्यावा यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ समोर चार जणांनी 6 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, परंतु दोन दिवसांचा कालावधी होऊनही विघापिठ प्रशासनाने दखल घेतली नाही, ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिला असुन उपोषण कर्ते यांच्यी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे. स्वारातीम विघापिठ कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात , आम्ही शेतकरी पाल्य वांरवार पत्रव्यवहार करूनही आम्हाला विद्यापीठ न्याय देत नाही व्यतीरिक्त बाहेरचे व्यक्ती वि‌द्यापीठ सेवेत सामावून घेत आहे,आम्ही आमची जमीन वि‌द्यापीठाला देवून चूक केली का, आपण आम्हाला काम देण्याचे सोडून बाहेरील व्यक्तीनां कामावर घेतलेले अनेक आहेत. म्हणून आपण वि‌द्यापीठाने ठरलेल्या नियम...
Zilla Parishad schools : विद्यार्थ्योदय अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या प्रकाशमय

Zilla Parishad schools : विद्यार्थ्योदय अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या प्रकाशमय

करियर, नांदेड
भोकर, साई चौहान| उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विद्यार्थ्योदय अभियानाअंतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत विजेची सोय झाल्याने शाळा प्रकाशमय झाल्या.आणि प्रत्येक वर्गात पंखे बसविण्यात आले आहेत. यानंतर रंगरंगोटी, विविध सुविधा, गुणवत्ता बाबत काम होणार आहेत. मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेंचे विज बिल थकल्याने महावितरणने अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला होता.तर काही शाळांना अद्यापपर्यंत वीज कनेक्शनच मिळाले नाही. मधल्या काळात काही शाळा डिजिटल झाल्या. मात्र वीजच नसल्याने शाळा डिजिटल कशा होणार. भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी विद्यार्थ्योदय अभियान हाती घेतले. या अभियानात अंतर्गत फेब्रुवारी पासून तालुक्यातील सर्व शाळेत वीज जोडण...
Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड

Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड l दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे त्या विभागाच्या सचिव पदी आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे या नियुक्ती बद्दल नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करून पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे. महाराष्ट्रातील दिव्यांगाना एक जगण्याचं बळ मिळावं त्यांच्यापर्यंत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना पोहोचाव्या व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या दिव्यांग कल्याण विभागावर गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने नुकतीच आय.ए.एस असलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. ...
error: Content is protected !!