HomeकरियरJournalists Association : राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे...

Journalists Association : राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसडे तर मराठवाडा सचिवपदी चंद्रकांत वाघमारे

लोहा| येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण संवाद बैठक संपन्न झाली. या बैठकीचे आयोजक , ऊपसंपादक तथा पत्रकार चंद्रकांत वाघमारे, पत्रकार बाळासाहेब बुद्धे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश प्रदेश सचिव शेख मकबुल अहेमद, अँडव्होकेट गणेश बिनगे, ईरशाद पठाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्वरित जिल्हा कार्यकारिणीची कंधार व लोहा तालुका कार्यकारिणीची तसेच राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीत जेष्ठ पत्रकार बालाजी धनसरे यांची महाराष्ट्र राज्य बहुभाषिक पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मा.श्री. लक्ष्मीकांत कस्तुरे यांनी केली या विशेष बैठकीमध्ये नियुक्तीपत्र प्रधान करण्यात आले.

लोहा तालुका ईतर कार्यकारिणीची निवड करण्यात आली, कीर्तीमाला महाबळे लोहा तालुकाध्यक्ष तर प्रेमानंद कांबळे सरचिटणीस उत्तम हंकारे उपाध्यक्ष केशव कंधारे सचिव हनुमंत कंधारे सहसचिव तर कंधार तालुका अध्यक्ष म्हणून चंद्रकांत मोरे उपाध्यक्ष म्हणून दिलीप शंकपाळे सचिव म्हणून व्यंकटी टोकलवाड यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. याच बैठकीत मराठवाडा सचिव म्हणून मा . श्री.चंद्रकांत वाघमारे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब बूद्धे यांची निवड करण्यात आली व नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे म्हणाले की 1991 पासून बालाजी धनसडे हे पत्रकारिता व आंबेडकर चळवळी मधील सक्रिय असून ते निरर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जातात.

त्याची दखल घेऊन बहुभाषिक पत्रकार संघाने त्यांचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचे ठरवून त्यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडीमुळे निश्चितच पत्रकार संघाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करून पत्रकार बांधवांनी बालाजी धनसडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीडपणे लिखाण करून पत्रकारावरील हल्ले थांबवण्यासाठी पत्रकाराचे मजबूत संघटन उभे राहावे व प्रखर लढा उभारावा त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी नव्यानेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त झालेले जेष्ठ पत्रकार बालाजी धनसरढे म्हणाले की पत्रकारिता हे क्षेत्र जोखीमेचे जरी असले तरी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करून काळे धंदे भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवावा. तसेच गोरगरीब जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी प्रखर लिखाण करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा लोकशाहीमध्ये पत्रकार ची भूमिका नेहमीच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध अग्रेसर असली पाहिजे. तरच अन्याय अत्याचार दूर होतील यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणी चालवाव्यात असे आव्हान केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments