देगलूर, नांदेड| देगलूर तालुक्यातील मरखेल जि.प.शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने वाईट नजर ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात त्या… आरोपी शिक्षकावर शनिवार दि. 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे पहिले आदर्श असतात मात्र तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर कार्यरत असलेले सदानंद विद्यासागर भुताळे या शिक्षकांनी हा आदर्श पायदळी तुडवला आहे. त्याच शाळेत इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपी शिक्षक हा मागील एक महिन्यापासून लैंगिक उद्देशाने पाठलाग करत होता. एव्हढेच नाहीतर त्याने फिर्यादी पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केला आहे.

याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गु .र .नंबर 22 / 2025 कलम 75 (1), (2) 78 भारतीय न्याय संहिता सह कलम 12 पोस्को अंतरंगात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक हा अटक असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे करीत आहेत.
