हिमायतनगर,अनिल मादसवार| एकंबा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी सुरु असलेल्या दोन उपोषणकर्त्यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली (The condition of two hunger strikers) आहे. त्या दोघांना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, आज उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. जर कार्यवाही नाही झाली तर चौकशीच्या नावावर दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांनी कागदोपत्री कामे दाखवून केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दिनांक २४ जानेवारी पासून हिमायतनगर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर तंटा मुक्त समिती अध्यक्ष राम कंदेवाड, यशवंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश लूमदे, श्रीरंग सूर्यवंशी, गणेश घुंगराळे, राजू देशपांडे, राविकुमार कानिंदे, वैभव कंदेवाड यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यापैकी आमरण उपोषणातील तंटा मुक्त समिती अध्यक्ष राम कंदेवाड, श्रीरंग सूर्यवंशी या दोघांची प्रकृती तिसऱ्या दिवशी दिनांक 26 जानेवारी रोजी खालावली होती. डॉक्टरांनी उपस्थित होऊन तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार केले आहेत.


आज सोमवारी आमरण उपोषणाचा चौथा दिवस उजाडला आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून सुरू एकंबा गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याला प्रशासनाने गंगाभीर्याने घेतले नसल्याचे तिसऱ्यांदा सुरु केलेल्या उपोषणाच्या पावित्र्यावरून दिसून येत आहे. जोपर्यंत या प्रकरणाची तक्रारकर्त्याच्या समक्ष चौकशी होऊन संबंधित भ्रष्टाचार्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत कोणत्ययी परिस्थितीत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. जर गावाच्या विकास कामाच्या नावावर स्वतःची घरे भरून भ्रष्टाचार करू पाहण्यावर कार्यवाही झाली नाहीतर दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आत्मदहन करू असा इशाराही उपोषणकर्त्यानी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिला आहे.


आमदारांच्या आदेशाला हिमायतनगर पंचायत समितीकडून केराची टोपली
हिमायतनगर येथे मागील 12 दिवसापूर्वी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार मध्ये एकंबा येथील भ्रष्टाचार प्रकरण चांगलेच गाजले होते. यावेळी आमदार महोदयांनी प्रश्नातील सबंधितांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेशित केले होते. मात्र अजूनही गटविकास अधिकारी व समबंधित पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही, केवळ उपोषणकर्त्यांना चौकशी केली जात असल्याचे पत्र देऊन दिशाभूल करण्याचे काम करून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. याकडे आमदार महोदय यांनी लक्ष देऊन ग्रामपंचायतीतील भ्रष्ट अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कसा धडा..? शिकवतील आणि आदेशाला केराची टोपली दखविणाऱ्यावर काय..? कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
