HomeनांदेडDilip Thakur : "नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार" दिलीप ठाकूर याना जाहीर

Dilip Thakur : “नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार” दिलीप ठाकूर याना जाहीर

नांदेड| स्वा. सावरकर जयंती महोत्सवानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड संचलित स्वा. सावरकर अध्यासन केंद्र यांच्या वतीने 29 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता कुसुम सभागृह येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांच्या अध्यक्षतेखाली “नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार” वितरण करण्यात येणार असून दिलीप ठाकूर यांचा १०२ वा पुरस्कार आहे.

या वर्षी पासून देण्यात येणाऱ्या “नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार” धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर (स्वा. सावरकर विचारप्रवर्तक व लेखक),डॉ. मालपाणी संतोष (मधुमेह तज्ञ),डॉ. मल्हार लाटकर (आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संशोधक),डॉ. मुकुंद करंबेळकर (स्त्रीरोगतज्ञ व ज्येष्ठ नाट्यकलावंत) यांना गौरविण्यात येणार आहे.

हा गौरव म्हणजे समाजहितासाठी कार्यरत राहणाऱ्या विचारवंताच्या कार्याची एक सार्वजनिक मान्यता आहे.धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना त्यांचा १०२ वा पुरस्कार म्हणून या गौरवाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या व्यासंगी लिखाण, समाजप्रबोधन आणि अमरनाथ यात्रेच्या माध्यमातून प्रकटलेली राष्ट्रभावना या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत आहे. ऍड. दिलीप ठाकूर यांनी 22 वर्षात 13 लाखापेक्षा जास्त रुग्णांना भाऊचा डबा वितरित केले आहेत . 61 महिण्यापासून अडीच हजारापेक्षा जास्त भ्रमिष्ट्रांची कटिंग दाढी करुन स्नान घालून नवीन कपडे देऊन करण्यात आलेला कायापालट या सारखे वर्षभरात 90 उपक्रम राबवितात.त्यापैकी 3 उपक्रम 365 दिवस अखंडीतपणे चालतात. यामुळे ऍड.ठाकूर यांना आतापर्यंत देशविदेशातून तब्बल 101 पुरस्कार मिळालेले आहेत.

मंगळवारी सावरकर व्याख्यानमालेचे उद्घाटन राष्ट्रीय सह-संघटन मंत्री, अ.भा.वि.प., मुंबई देवदत्त जोशी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी सिनेदिग्दर्शक, सावरकर अभ्यासक योगेश सोमण आणि ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक प्रा.शेषेराव मोरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी आ.बाबुराव कोहळीकर,आ.प्रतापराव चिखलीकर,आ.भीमराव केराम, भाजपा नांदेड शहराध्यक्ष अमर राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष कैलाशचंद काला, सचिव अॅड. सी. वनिता जोशी,प्रा. डॉ. संतोष कोटुरवार, उप प्राचार्या प्रा. डॉ. कल्पना कदम,उप प्राचार्या प्रा. डॉ. अर्चना भवानकर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments