Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

नांदेड, करियर, व्हिडीओ
हिमायतनगर| "हर घर तिरंगा" उपक्रमाच्या उत्साहपूर्ण वातावरणात हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी "वंदे मातरम", "भारत माता की जय" अश्या घोषणा देत सहभागी झाले होते. दिनांक 14 ऑगस्ट (गुरुवार) रोजी श्री परमेश्वर मंगल कार्यालय मैदानातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यां तिरंगा रैलीत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी " सहभागी होऊन भारत माता की जय", "वंदे मातरम" अशा घोषणां दिल्या. आजच्या तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय झाले होते. या रैलीत शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शहरातील विद्यार्थी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचे घोषवाक्ये देत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला...
Rashtra Mata Vidyalaya ; विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावे : प्रा. रविचंद्र हडसनकर राष्ट्रमाता विद्यालयात बहरला संवाद कोवळ्या मनांशी

Rashtra Mata Vidyalaya ; विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावे : प्रा. रविचंद्र हडसनकर राष्ट्रमाता विद्यालयात बहरला संवाद कोवळ्या मनांशी

नांदेड, करियर
नांदेड l शालेय जीवनापासूनच विद्यार्थी हा विज्ञाननिष्ठ असावा. जोपर्यंत आपण विज्ञाननिष्ठ असणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या प्रगतीचा मार्ग सापडत नाही असे मत सुप्रसिद्ध कवी, लेखक ,कथाकार ,ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि राष्ट्रमाता विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित करण्यात आलेल्या संवाद कोवळ्या मनांशी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रमाता विद्यालय संभाजीनगर कॅनॉल रोड येथे आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि राष्ट्रमाता विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवाद कोवळ्या मनांशी या बालकवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिगंबर क्षीरसागर यांची उपस्थिती होती . ...
Perkewad community : पेरकेवाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी भोकरला उपस्थित व्हावं – गोविंदराव उल्लेवाड

Perkewad community : पेरकेवाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी भोकरला उपस्थित व्हावं – गोविंदराव उल्लेवाड

नांदेड, करियर
हिमायतनगर| पेरकेवाड समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व शासकीय नोकरीस लागलेल्या युवकाचा गुणगौरव सोहळा भोकर येथे 26 आॅक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या भव्य अशा पेरकेवाड समाजाच्या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन शासकीय गुत्तेदार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव उल्लेवाड यांनी केले आहे. हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात भोकर येथे संपन्न होणार असलेल्या पेरकेवाड समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व शासकीय नोकरी लागलेल्या नागरिकांचा सत्कार सोहळा. या भव्य कार्यक्रमासाठी आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या महत्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. अक्कलवाड हे होते. जिल्हास्तरीय पेरकेवाड समाजाचा हा गुणगौरव सोहळा संपन्न होतो आहे. या भव्य अशा या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उल्लेवाड यांनी केले. पुढे बोलताना गोविंदराव उल्लेवाड ...
Har Ghar Tricolor Rally : उस्माननगर येथील चार शाळेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Har Ghar Tricolor Rally : उस्माननगर येथील चार शाळेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांपासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून सदरील अभियान यावर्षी सुध्दा राबविण्यात येत असल्याने दि १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी उस्माननगर येथील चारही शाळेतील विद्यार्थी, सहशिक्षक व काकांडी येथील युवा ॲकडमी यांनी तिरंगा रॅलीत सहभागी व्होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दरम्यान उशिरा आलेल्यांनी रॅलीत उभे राहून फोटो काढण्यासाठी लगबग दिसून आली. महाराष्ट्र शासनाच्या निदर्शना नुसार हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या आभियाना अंतर्गत उस्माननगर येथील चार शाळा व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी दत्त मंदिर, समता विद्यालय , झेंडा चौक ते गावातील प्रमुख मार्गाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य...
scholarship ; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू

scholarship ; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू

नांदेड, करियर
नांदेड| जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी MAHADBT पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झाले आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक ...
customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा

customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा

नांदेड, करियर
नांदेड| आरोग्य विमा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीविरोधात गंभीर आरोप उघड झाले आहेत. कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि परतावा प्रक्रिया विलंबित करून ग्राहकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. गायत्री स्वामी या विद्यार्थिनीला 104 अंश फॅरेनहाइट ताप आल्यामुळे तिला शिवाजीनगर, नांदेड येथील एका बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हे रुग्णालय स्टार हेल्थच्या मान्यताप्राप्त यादीत नसल्याने, कंपनीच्या प्रतिनिधींनी बिलाचा परतावा 8 दिवसांत मिळेल असे आश्वासन दिले. परंतु अनेक दिवस उलटूनही परतावा मिळालेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, कंपनीच्या प्रतिनिधींनी असेही सांगितले की, “ताप आल्यावर रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची गरज नाही.” सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ स्वामी यांनी सांगितले की, “मागील 4 वर्षांपासून मी सतत पॉलिसीचे हप्ते भरत आहे. एकही क्लेम दाखल केल...
Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा 2025 पहिला टप्पा अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा 2025 पहिला टप्पा अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम

करियर, नांदेड
लोहा| येथून जवळच असलेल्या पेनूर येथील विद्यालयात शासनाचा प्रत्येक शालेय उपक्रम राबविण्यामध्ये एक पाऊल पुढे असणाऱ्या बळीराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेनूर येथे शशिकलाबाई पाटील गवते गाईड पथकाने व शाळेतील इतर सर्व विद्यार्थीनी यांनी राखीपौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्याच शाळेत शिक्षण धेवून आज भारतमातेची सेवा व रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिक बांधवांना स्वनिर्मित पर्यावरणपुरक राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. त्याचबरोबर एक राखी माझ्या सैनिक भावासाठी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी स्वतः बनवलेलया आकर्षक तिरंगा राख्या व भावनिक सदेश असलेली भेटकार्ड, शुभेच्छा सदेश व चॉकलेट असलेली बंद लिफाफे मुख्याध्यापक राठोड ए.एन. यांच्याकडे जमा केले. यावेळी दशरथ गवते (भा.ति.सी.पु.बेळगाव), नागनाथ शिवाजी इंडियन आर्मी यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना...
Babu Jadhav : बाबू जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

Babu Jadhav : बाबू जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

नांदेड, करियर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए,एस,आय) बाबू नानू जाधव यांनी सन २०१३ ला विभागीय अर्हेता परीक्षा दिली होती. त्यांत ऊतिर्ण झालेले बाबू जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. बाबू जाधव हे सन २०१३ मध्ये शिदखेड पोलीस स्टेशन येथे जमादार म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यानी विभागिय परीक्षा दिली ,दि २४.७.२०२५ रोजी जाधव यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. बाबू जाधव यांना माहूर पोस्टे येथे नेमणूक देण्यात आली आहे ते दि,१० ऑगस्ट रोजी माहूर पोस्टे येथे हजर झाले असता पोलीस निरीक्षक गणेश कराड,पालसिंग ब्राह्मण,संदिप अंनेबोईनवाड, गजानन चौधरी,गेडाम, गजानन जाधव, पवन राऊत, गुहरक्षक दलाचे शे,रज्जाक,एस.पि.भगत.राहूल राठोड,अदिंनी अभिनंदन केले....
Raksha Bandhan ; बारूळ येथील वाघमारे परिवारातील चार बहीणीनी झाडास राखी बांधून अनोखा रक्षाबंधन केला साजरा

Raksha Bandhan ; बारूळ येथील वाघमारे परिवारातील चार बहीणीनी झाडास राखी बांधून अनोखा रक्षाबंधन केला साजरा

करियर, नांदेड
उस्माननगर l रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणी मधील प्रेमाचा गोडवा व कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हा सण स्त्री आणि पुरुषांमधील ( वृक्ष,झाड ) कोणत्याही प्रकारच्या भावा बहिणींच्या नात्याचा उत्सव म्हणून सर्वत्र अनुभवायला मिळतो. मात्र बारूळ ता.कंधार येथील वाघमारे परिवारातील सुमसांची,स्नेहल, स्वरा,मनस्वी, सानिध्या ह्या चार बहिणीनी आगळावेगळा रक्षाबंधन सण "निसर्ग माझा भाऊ" म्हणून घरच्या शेतातील झाडाला राखी बांधत निसर्ग संवर्धनाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्याचं काम यांनी केलं आहे. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो तसेच निसर्ग आपला रक्षण करतो म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हीच खरी आपली जबाबदारी आहे . असा ठाम विश्वास ह्या चार बहिणींचा आहे. सुमसांची , स्नेहल, स्वरा, मनस्वी, सानिध्या यांच्या उपक्रमातून पर्यावरण प्रेमी साठी एक प्रेरणा मिळत असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर...
Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंच्या दुसरा हप्त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंच्या दुसरा हप्त्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक

करियर, नांदेड
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती ('B'Statement) महाआयटी या ऑनलाईन प्रणालीवर समाविष्ट करावी. त्यानंतर त्याची मूळ प्रत समाज कल्याण कार्यालयातील स्वाधार विभागात लवकर जमा करावी. जेणे करून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द ...
error: Content is protected !!