Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Workshop : समाज कल्याणच्या विविध योजनेची कार्यशाळा संपन्न

Workshop : समाज कल्याणच्या विविध योजनेची कार्यशाळा संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणा-या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या सर्व योजना ऑनलाईन प्रणालीवर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे नुकतीच 19 ऑगस्टी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य व उपप्राचार्य तसेच शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना भारत सरकार शिष्यवृत्त...
Sanjay Chavan ; संजय चव्हाण यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Sanjay Chavan ; संजय चव्हाण यांना पीएच.डी. पदवी प्रदान

नांदेड, करियर
नांदेड l गंगाखेड येथील संजय उत्तमराव चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली. "Production and Characterization of Bioactive Compounds of Microbial Origin against Multi Drug Resistant Strains of Escherichia coli या विषयावर प्रा. टी.ए.कदम,जैवशाश्न संकुल, स्वा.रा. ती.म.विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोधप्रबंध सादर केला. श्री. संजय उत्तमराव चव्हाण यांनी CSIR-NET JRF, GATE आणि MH-SET अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले आहे, हे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन क्षमतेचे द्योतक आहे. श्री. चव्हाण यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा.टी.ए.कदम, आपल्या कुटुंबीय, सहकारी,तसेच जैवशाश्नसंकुलातील शिक्षकवृंद व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड प्रशासनाला दिले आहे....
Award : नावामनपाचे डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना वार्षिक उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

Award : नावामनपाचे डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना वार्षिक उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान

नांदेड, करियर
नवीन नांदेड़ l भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते वर्षभर उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला, यावेळी उपायुक्त यांच्या सह सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थितीती होती. मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वर्षातील सर्वोत्तम अधिकारी हा पुरस्कार मुख्य उद्यान अधिक्षक, तथा सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त आपत्ती व्यस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सिडको क्षेत्रीय कार्यालययातील र्अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत....
Dr. Manisha Wadiyar ; हावगीस्वामीत डॉ.मनीषा वडियार यांच्या हस्ते लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन

Dr. Manisha Wadiyar ; हावगीस्वामीत डॉ.मनीषा वडियार यांच्या हस्ते लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन

करियर, नांदेड
उदगीर l येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने दि.१४ऑगस्ट २०२५ रोजी "लोकप्रशासन अभ्यास मंडळ उद्घाटन व भितीपत्रकाचे विमोचन कार्यक्रम* आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे तर उद्घाटक म्हणून भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य डॉ. मनीषाताई वडीयार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरअप्पा हरकरे आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख व संयोजक डॉ. लक्ष्मण उलगडे, प्रा. प्रदीप पत्की यांची उपस्थिती होती. प्रारंभी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये मागील पंधरा वर्षांपासून विभागामार्फत विद्यार्थी विकास केंद्रित अनेक उपक्रम, कार्याची सविस्तर माहिती अक्षय दुवे यांनी दिले.*लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन व ऑपरेशन सिंदूर : प्रशासनाची भूमिका...
Hutatma Jayawantrao Patil College ; हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल संपन्न

Hutatma Jayawantrao Patil College ; हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल संपन्न

नांदेड, करियर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक विज्ञान शाळेने संलग्न महाविद्यालयांसाठी 'कॉलेज कनेक्ट' उपक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्ता मगर. सहाय्यक प्रा. विजयमाला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला शैक्षणिक दौऱ्यावर भेट दिली. समाज विज्ञान शाळेतील संचालक, प्राध्यापक आणि संशोधन विद्वानांनी भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि इतर उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना माननीय प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनीही मार्गदर्शन केले. माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली, 'कॉलेज कनेक्ट' उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांम...
Gaurav Awards ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार

Gaurav Awards ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरव पुरस्कार

नांदेड, करियर
नांदेड l आयआयटी मुंबई आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या " सुपोषित नांदेड " कार्यक्रमांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट 'सुपोषित नांदेड' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे, तसेच कुपोषण कमी करणे हा आहे. या कार्यक्रमा' अंतर्गत, जिल्ह्यातील प्रत्येक प्रशिक्षिकाणे अर्भक आणि बालकाला दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी या विषयी मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मच...
Indian woman ; आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखरावर भारतीय महिलेनी फडकविला राष्ट्रध्वज

Indian woman ; आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखरावर भारतीय महिलेनी फडकविला राष्ट्रध्वज

नांदेड, करियर, देश विदेश
नांदेड l येथील उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव कुबडे यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजारो येथे आपल्या भारताचा व महाराष्ट्र पोलीस चा झेंडा 15ऑगस्ट रोजी फडकविला आहे. 15 सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/(सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला. पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी ...
Guardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : गुणवत्तेसोबतच सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, करियर
नांदेड| नांदेड शहर एक एज्युकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शहरात सुरक्षित, निर्भय वातावरण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेसोबत सुरक्षित शहर म्हणून नांदेडचा लौकिक निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. आज कोनाळे कोचिंग क्लासेस येथे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कोचिंग क्लासेसचे आर.बी.जाधव, ...
Nandede ; गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्ज्वल भविष्य, डॉ.गोविद नांदेडे

Nandede ; गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्ज्वल भविष्य, डॉ.गोविद नांदेडे

नांदेड, करियर
नवीन नांदेड l गुणवता धारक विध्यार्थी हे ऊद्याचे उज्ज्वल भविष्य असुन ग्रामस्थांनी गावातील मतभेद विसरून एकत्र या,वातावरण टिकवून ठेवा व गावातील ग्रामस्थांनी शिक्षणासाठी पाल्यांसाठी केलेले प्रयत्न हे पुढच्या यशाची पायरी असल्याचे प्रतिपादन पुर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रसंगी केले. 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य संग्राम सप्ताह अंतर्गत, ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता.लोहा जिल्हा नांदेड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही पाचव्या वर्षी दहावी व‌ बारावी मधील विशेष गुणवत्ते मध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थी सोहळा व जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थीनी हिच्या 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी टाकळगाव येथे माजी सेवानिवृत्त पुर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे व सेवानिवृत्त अभियंता जि.एस.गायकवाड यांच्या उपस्थितीत स...
Dr. S.R. Ranganathan ; हुजपा मध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी

Dr. S.R. Ranganathan ; हुजपा मध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी

करियर, नांदेड
हिमायतनगर l येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम लाभल्या तर स्टाफ सेक्रेटरी एम.पी गुडाळे हे लाभले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले यांनी केले. ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल प्रा राजू बोंबले व ग्रंथालय परिचर श्री विश्राम देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आध्यक्षा यांनी आपल्या भाषणातून आजच्या युगामध्ये पुस्तकाचे महत्व काय आहे हे सर्वांना पटवून दिले त्याचप्रमाणे विविध उदाहरणे देऊन काळानुरूप व आजची पिढी यासाठी ग्रंथ किती महत्त्वाचे आहेत ह...
error: Content is protected !!