Homeनांदेडscholarship ; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू

scholarship ; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू

नांदेड| जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी MAHADBT पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झाले आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक नुकतीच 11 ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील काही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये योजनांबाबत जनजागृती करावी. बैठकीत भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे.

स्वाधार योजनेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची उपस्थित तपासून सादर करणे. महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर स्वाधार व भा.स.शी.बाबत नोटीस लावणे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल त्वरीत सादर करणे. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments