HomeनांदेडTricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने...

Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

हिमायतनगर| “हर घर तिरंगा” उपक्रमाच्या उत्साहपूर्ण वातावरणात हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अश्या घोषणा देत सहभागी झाले होते.

IMG 20250814 155558 Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

दिनांक 14 ऑगस्ट (गुरुवार) रोजी श्री परमेश्वर मंगल कार्यालय मैदानातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यां तिरंगा रैलीत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ” सहभागी होऊन भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणां दिल्या. आजच्या तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय झाले होते.

IMG 20250814 162259 Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

या रैलीत शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शहरातील विद्यार्थी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचे घोषवाक्ये देत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीदरम्यान “वंदे मातरम”, “भारत माता की जय” या घोषणा दुमदुमल्या आणि परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला.

IMG 20250814 155616 Tricolor rally : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत हिमायतनगरात तिरंगा रॅली; तिरंगा रैलीने वातावरण देशभक्तीमय

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments