Tuesday, May 19

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Student reception : निर्मिती नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत व शपथविधी सोहळा संपन्न

Student reception : निर्मिती नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत व शपथविधी सोहळा संपन्न

नांदेड, करियर
नांदेड| मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था,नांदेड अंतर्गत निर्मिती नर्सिंग कॉलेजमध्ये जी.एन.एम. तसेच ए.एन.एम. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा सिसोदिया या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून निशा लालबाजी घाटे, डॉ. वैशाली नव्हाट,सौ. दिपा भावसार यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रथम फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दलची शपथ देवविण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या अभ्यासक्रमांचे महत्त्व तसेच सेवेची महती भाषणातून सांगितली. कार्यक्रमास निर्मिती नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी.एन.एम.चे प्रणाली चेटले, स्नेहल बामणीकर, सुजाता कांबळे, शिवानी पु...
Lopamudra : वारकड परिवारातर्फे शिखर काबीज कर्त्या सपोउनि सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचा सत्कार

Lopamudra : वारकड परिवारातर्फे शिखर काबीज कर्त्या सपोउनि सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचा सत्कार

करियर, नांदेड
उस्माननगर l नुकत्याच आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर काबीज करून तिरंगा ध्वजारोहण फडकावून मोठे धाडस करून आल्यावर उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील सुपरिचित असलेल्या वारकड परिवारातर्फे शिखर यौध्द्या सौ.लोपामुद्रा( सुशिल ) आनेराव -कुबडे यांचा सत्कार करण्यात आला. उस्माननगर पोलिस स्टेशनच्या विरांगणी , सपोउनि सौ लोपामुद्रा आनेराव -कुबडे या ९ ऑगस्टला आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. पंधरा ऑगस्टला उंच शिखरावर पोहचून तिरंगा ध्वजारोहण फडकावून नाव सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले आहे. नुकत्याच उस्माननगर येथे आगमन झाल्यानंतर उस्माननगर येथील भाजपचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी चेअरमन,माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी , उद्योजक बसवेश्वर वारकड , सौ. भाग्यश्री वारकड , नरेंद्र वारकड गुरूजी व परिवारातर्फे यथोचित शाल श्रीफळ पुष्पमाला अर...
Balaji Temple ; हडको बालाजी मंदिर समिती सदस्य पदी सतीश मोरे यांची निवड

Balaji Temple ; हडको बालाजी मंदिर समिती सदस्य पदी सतीश मोरे यांची निवड

नांदेड, करियर
नवीन नांदेड़ l हडको येथील श्री बालाजी मंदिर येथील माजी सचिव कै.बालासाहेब मोरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा रिक्त जागी मंदिर विश्वस्त समितिच्या वतीने त्यांच्या मुलगा सतीश मोरे यांची निवड करण्यात आली,या निवडीबद्दल विश्वस्त समिती यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. हडको येथील श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या वतीने माजी सचिव कै. बालासाहेब मोरे काका यांच्ये अकाली निधना नंतर त्यांचा मुलगा सतीश मोरे यांची विश्वस्त मंडळाने सदस्यपदी निवड केली ,21 ऑगस्ट रोजी श्री भगवान बालाजी मंदिर हडको येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन विश्वस्त मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरुण दामकोंडवार उपाध्यक्ष प्रकाश सिंह परदेशी, सचिव माणिक देशमुख, कोषाध्यक्ष चन्द्रशेखर चव्हाण, सचिव बालकृष्ण येरगेवार व सदस्य मुख्य पुजारी इद्रंमुनि दुबे,प्रकाश महाराज यांची उपस्थिति होती. त्यांच्या या निवडीबदल अभिनंदन केले आहे....
Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

नांदेड, करियर
नांदेड| सेवाग्राम वर्धा येथे झालेल्या पत्रकार संरक्षण समितीच्या राज्यस्तरीय संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांची पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. सदरील नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व राज्य उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांच्या हस्ते महेंद्र गायकवाड यांना देण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी नोंदणीकृत संघटना असून या संघटनेचे राज्यस्तरीय संमेलन सेवाग्राम वर्धा येथे पार पडले. या संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या, प्रश्न गायकवाड यांनी सोडविल्या असून पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी ते नेहमी लढत असतात. पत्रकारांवरील अन्याय,...
graduation ceremony : हु.ज.पा. महाविद्यालय हिमायतनगर येथे पदवी वितरण समारंभ संपन्न

graduation ceremony : हु.ज.पा. महाविद्यालय हिमायतनगर येथे पदवी वितरण समारंभ संपन्न

करियर, नांदेड
हिमायतनगर| बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (परिक्षा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भुषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. किरणकुमार बोंदर ( सह संचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड) हे लाभले होते. मारोतराव फुलारी कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय किनवट व धोंडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर डाॅ. एल.बी.डोंगरे (CDC सदस्य), प्रा. एम.पी गुंडाळे (,Staff Secretaty), डाॅ. जी.पी.दगडे (NAAC Coordinator), प्रा. डॉ. के.बी पाटील (परिक्षा विभाग)डी सी देशमुख परीक्षा विभाग सहाय्यक यांची उपस्थिती होती. कार्...
Eng. Chandraprakash Deglurkar ; इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार !

Eng. Chandraprakash Deglurkar ; इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार !

नांदेड, करियर
नांदेड l अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते, सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक प्रखर व्याख्याते व पत्रकार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना ओबीसी भूषण मित्र पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. ओबीसी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी एका व्यक्तीस नांदेड जिल्हा ओबीसी भूषण मित्र पुरस्कार देण्यात येतो. २०२४ यावर्षीच्या पुरस्कारासाठी साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी कर्मचारी समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. जी. माचनवार, जिल्हा सचिव रविंद्र बंडेवार तसेच इंजि. लक्ष्मण लिंगापुरे, प्रा. दिलीप काठोटे, सतीशचंद्र शिंदे आणि राजेश चिटकुलवार यांनी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या विजयनगर नांदेड येथील निवासस्थानी जाऊन पुरस्कार निवडीचे पत्र देऊन सन्मान केला. ओबीसींचे जनजागरण, प्रबोधन व मंडल आयोग चळवळीत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा ...
Success : करंजी येथील विजयमाला कदम हिचे TAIT परीक्षेत यश

Success : करंजी येथील विजयमाला कदम हिचे TAIT परीक्षेत यश

करियर, नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील विजयमाला जयवंतराव कदम हिने शिक्षक पदासाठी झालेल्या TAIT परीक्षेत तब्बल 146 गुण मिळवत गाव, कुटुंब व गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. विजयमालाचे शैक्षणिक पात्रता उल्लेखनीय आहे. तिने एम.ए. अर्थशास्त्र (सेट – अर्थशास्त्र), एम.ए. मराठी, बी.एड., एम.एड. तसेच CTET पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामागे परिश्रम, गुरुजनांचे मार्गदर्शन व परिवाराचे आशीर्वाद हेच बळ ठरले. या यशानिमित्त करंजी येथील मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी सर व कै. श्री. दे. वी. सरसम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावचे पोलिस पाटील बापूराव मिराशे, कापसे गुरुजी तसेच नवोदय क्लासेस, हिमायतनगरचे मार्गदर्शक प्रा. सज्जन कदम (ॲडव्होकेट) उपस्थित होते. सत्कार सोहळ्यावेळी विद्यार्थिनीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तर गुरूंच्या डोळ्यांत अभिमानाची चमक दिसून आल...
Zilla Parishad Nanded ; डिजिटल मित्र पोर्टल- जिल्हा परिषद नांदेडचा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी सुलभ, जलद व पारदर्शक सेवा एका क्लिकवर उपलब्ध

Zilla Parishad Nanded ; डिजिटल मित्र पोर्टल- जिल्हा परिषद नांदेडचा अभिनव उपक्रम नागरिकांसाठी सुलभ, जलद व पारदर्शक सेवा एका क्लिकवर उपलब्ध

नांदेड, करियर
नांदेड l 21- नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने डिजिटल मित्र पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कृषी, पशुसंवर्धन, घरकुल, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह विविध विभागांच्या योजना आणि सेवा नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना घरी बसून शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला असून, यामुळे वेळेची बचत, पारदर्शकता आणि शासनावरील नागरिकांचा विश्वास वाढणार आहे. योजनांबाबत माहिती व्हिडिओ क्लिपच्या स्वरूपात पाहता येणार आहेत. या पोर्टलवर लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून तक्रारी, मागण्या व निवेदन सादर करण्याची सोयही या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती 48 तासांत ऑनलाईन तपासता येईल...
Nanded ; महीला पोलिस अधिकारी सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचे नांदेड स्थानकावर जंगी स्वागत

Nanded ; महीला पोलिस अधिकारी सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचे नांदेड स्थानकावर जंगी स्वागत

करियर, नांदेड
उस्माननगर l आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजरो येथे १५ ऑगस्ट रोजी शिखरावर जाऊन भारतीय तिरंगा झेंडा फडकावून मायदेशी भारतात नांदेड येथील हुजूर साहीब रेल्वे स्थानकावर दि.१९ ऑगस्ट रोजीआगमन झाल्यानंतर परिवाराने जंगी स्वागत केले. उस्माननगर पोलिस स्टेशनच्या सपोउनि म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे -आनेराव या दि ९ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासासाठी नांदेड येथुन रवाना झाल्या त्यानंतर शिखरावर जाण्यासाठी दि. ११ ऑगस्टला सुरूवात केली तर दि.१५ ऑगस्ट ला सकाळी शिखरावर जावून ९: ३० मिनिटानी शिखरावर भारतीय तिरंगा झेंडा फडकविला. सौ.लोपामुद्राआनेराव - कुबडे या धाडसी व कर्तृत्ववान महीला पोलिस अधिकारी म्हणून पोलिस खात्यात ओळख आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजून दक्षिण आफ्रिका खंडात...
pre-competitive exam : आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

pre-competitive exam : आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

नांदेड, करियर, मुंबई
मुंबई| अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) राज्यातील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे. मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार १२ वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. २९ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती व प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common...
error: Content is protected !!