HomeकरियरDr. Manisha Wadiyar ; हावगीस्वामीत डॉ.मनीषा वडियार यांच्या हस्ते लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे...

Dr. Manisha Wadiyar ; हावगीस्वामीत डॉ.मनीषा वडियार यांच्या हस्ते लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन

उदगीर l येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने दि.१४ऑगस्ट २०२५ रोजी “लोकप्रशासन अभ्यास मंडळ उद्घाटन व भितीपत्रकाचे विमोचन कार्यक्रम* आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे तर उद्घाटक म्हणून भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य डॉ. मनीषाताई वडीयार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरअप्पा हरकरे आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख व संयोजक डॉ. लक्ष्मण उलगडे, प्रा. प्रदीप पत्की यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहाराने सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये मागील पंधरा वर्षांपासून विभागामार्फत विद्यार्थी विकास केंद्रित अनेक उपक्रम, कार्याची सविस्तर माहिती अक्षय दुवे यांनी दिले.*लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे उद्घाटन व ऑपरेशन सिंदूर : प्रशासनाची भूमिका”* या भित्तीपत्रकाचे विमोचन संस्थेचे सदस्य डॉ. मनिषाताई वडियार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेवर अधिक भर द्यावे, तसेच स्पर्धापरीक्षेत उज्ज्वल यश मिळविण्यासाठी सखोल अभ्यास करावे असे अनमोल विचार मांडले .

त्याचबरोबर संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरअप्पा हरकरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गाणे सादर करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर अध्यक्षीय समारोपात डॉ.ए.ए.काळगापुरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हटले की, विद्यार्थी हा संस्कारी, कर्तव्यशील, ध्येयवादी असावा , प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी लोकप्रशासन विषय अत्यंत उपयुक्त ठरेल.यावेळी बी. ए. , बी.एस्सी. बी.कॉम. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपादक मंडळातील संपादक कु. संध्या शिंदे, उपाध्यक्ष अक्षय दुवे, सचिव प्रिया सूर्यवंशी तसेच सदस्यांमध्ये आकाश कांबळे, वैभवी वारद, जीवन कसबे, वैशाली तोटगिरे, लाल सुमित, मदने ऐश्वर्या, अंबिका कांबळे, दीक्षा गायकवाड , रवी सूर्यवंशी, समीक्षा कांबळे, सदिया लद्दाफ, उम्मे लद्दाफ व इतर अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया सूर्यवंशी तर शेवटी आभार सुरज पिंपळे यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments