Prashant More : २६ रोजी लोहयात प्रसिद्ध , गीतकार प्रशांत माेरे यांची विशेष उपस्थिती

hqdefault Prashant More : २६ रोजी लोहयात प्रसिद्ध , गीतकार प्रशांत माेरे यांची विशेष उपस्थिती

लोहा| मुंबई येथील आई च्या कविता तसेच बदल्या व्यवस्थेवर काव्यातून चिंतन करायला भाग पडणारे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रशांत मोरे यांच्या विशेष उपस्थितीत लोहा शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयाच्या वतीने २६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तुळजाई मंगल कार्यालयात कार्यक्रम होणार आहे.शहरात पहिल्यांदाच आई “च्या कविता व गाण्याचे अतिशय प्रभावी सादरीकरण होणार आहे

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या प्रेरणास्थान माताेश्री मुक्ताई धोंडगे यांच्या 61 व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 26 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध कवी गीतकार प्रशांत मोरे याची विशेष प् उपस्थितीती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकाप कार्यकर्ते रणधीरसिंह शंकरसिंह गहेरवार हे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष, प्रा.डाॅ.पुरुषोत्त धोंडगे, संस्थेचे सहसचिव अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रा.महेश मोरे द्वारा लिखित व डॉ. शोभा शिंदे द्वारा इंग्रजी अनुवादित ‘मुक्ताई’ या किशोर कादंबरी चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोकराव गवते, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री व्ही.जी.चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस बोधगिरे, श्री सूर्यकांत लुंगारे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top