हिंगोली| ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणारे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करताना समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी बंजारा समाजाची जुनी मागणी अनुसूचित जमात प्रवर्गातील आरक्षण या प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून लढा उभा करण्याचा मानस बोलून दाखवला.


कारण बंजारा समाज हा अनुसूचित जमाती आरक्षणाची सर्व निकष पूर्ण करत असून, हा समाज भारताचा प्राचीन समाज आहे. संपूर्ण देशामध्ये विविध राज्यात हा समाज आढळतो ज्याची बोलीभाषा संपूर्ण देशात एकच असून यामध्ये सांस्कृतिक ,सामाजिक, आर्थिक एकता आढळते त्यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण हे बंजारा समाजाचा अधिकार असून त्यापासून बंजारा समाजास वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आरक्षणाचा हा अधिकार मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ लढा उभारणार असल्याचे मत व्यक्त केले.


या बैठकीच्या वेळी त्यांच्यासोबत मनसे जिल्हाध्यक्ष लातूर संजय राठोड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची विलास राठोड नांदेडचे सुनील नायक, विनोद चव्हाण हे उपस्थित होते या बैठकीचे आयोजन भोगराज राठोड, अशोक चव्हाण, ऍड सिताराम राठोड ,ऍड पंजाबराव चव्हाण, रामदास चव्हाण, सिताराम जाधव,मोहनराव जाधव, लालसिंग राठोड ,उत्तम राठोड, एन डी चव्हाण, नामदेव चव्हाण, पिराजी राठोड आदी सह बंजारा बांधवांनी केले.




