Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

UGC NET exam ; आदित्य भांगे यांचे युजीसी नेट परीक्षेत उज्वल यश

UGC NET exam ; आदित्य भांगे यांचे युजीसी नेट परीक्षेत उज्वल यश

नांदेड, करियर
नांदेड l सामाजिक कार्यकर्ते, लेखक व कवी आदित्य बालाजीराव भांगे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या युजीसी नेट परीक्षेच्या निकालात यश मिळविले आहे, उच्च शिक्षण क्षेत्रातील ही कठीण समजली जाणारी पात्रता परीक्षा त्यांनी उत्तीर्ण करून स्वतःच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मूळचे बहाद्दरपूरा (ता.कंधार) येथील असलेले भांगे सध्या नांदेडमध्ये वास्तव्यास असून विविध सामाजिक आणि साहित्यिक चळवळीशी संबंधित आहेत. नेट-सेट-पीएच.डी धारक संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून ते कार्य करीत असताना सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेतील अन्याया विरोधात त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये पुढाकार घेतला आह. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात तासिका तत्वावर अध्यापन सुरू केले.आता युजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी स्पर्धा पर...
Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे ‘मराठवाडा आयकॉन ’ पुरस्कार

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे ‘मराठवाडा आयकॉन ’ पुरस्कार

करियर, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना त्त्यांच्या कार्याची दखल घेत 'नवभारत / नवराष्ट्र' या प्रसिद्ध राष्ट्रीय दैनिकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'मराठवाडा आयकॉन' पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात 'मराठावाडा आयकॉन ' पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जनसामान्यांच्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या अनुषंगाने हदगाव येथील कर्तव्यदक्ष आणि गोरगरीब, वंचित, कष्टकरी जनतेला समाजिक पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब अबाल वृद्धासाठी देवदूत ठरत असलेल्या हदगावच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना त्त्यांच्या कार्याची दखल घेत 'नवभारत / नवराष्ट्र' या प्रसिद्ध राष्ट्रीय दैनिकांच्या वतीने दि...
Call for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Call for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

करियर, नांदेड
नांदेड| शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड येथे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 जुलै 2025 हा अंतिम दिनांक आहे. या प्रवेश परीक्षेसाठी पालक, विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले आहे. या जवाहर नवोदय विद्यालयात गरजू व होतकरू हुशार, सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निवड चाचणी प्रवेश परीक्षा द्वारे निवड करण्यात येते. अधिक माहितीसाठी 9926928732, 9977994732 क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्...
Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

Chief Executive Officer Meghna Kavali : शिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही नारायण मिसाळ यांच्या कार्यशैलीची खरी ओळख – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

करियर, नांदेड
नांदेड| जलजीवन मिशन व स्वच्छता अभियानांतर्गत नारायण मिसाळ यांनी कोणतेही काम माझे नाही असे न म्हणता, प्रत्येक काम कार्यक्षमतेने पार पाडले. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी काढले. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नारायण मिसाळ यांची बदली परभणी जिल्‍हयातील पुर्णा पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून झाली. यानिमित्त आज जिल्हा परिषद नांदेडच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षातर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ मेघना कावली होत्या. कार्यक्रमास जलजीवन मिशनचे प्रभारी प्रकल्प संचालक अमित राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागा...
Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व ॲटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्हयातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत ना. वडस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -41, मेकॅनिक डिझेल- 32, शिट मेटल वर्क्स-8, ॲटो इलेक्ट्रीशीयन-5, मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर-2, पेन्टर जनरल-2, वेल्डर गॅस ॲन्ड इलेक्ट्रीशन...
Prashant More : २६ रोजी लोहयात प्रसिद्ध , गीतकार प्रशांत माेरे यांची विशेष उपस्थिती

Prashant More : २६ रोजी लोहयात प्रसिद्ध , गीतकार प्रशांत माेरे यांची विशेष उपस्थिती

नांदेड, करियर
लोहा| मुंबई येथील आई च्या कविता तसेच बदल्या व्यवस्थेवर काव्यातून चिंतन करायला भाग पडणारे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रशांत मोरे यांच्या विशेष उपस्थितीत लोहा शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालयाच्या वतीने २६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तुळजाई मंगल कार्यालयात कार्यक्रम होणार आहे.शहरात पहिल्यांदाच आई "च्या कविता व गाण्याचे अतिशय प्रभावी सादरीकरण होणार आहे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या प्रेरणास्थान माताेश्री मुक्ताई धोंडगे यांच्या 61 व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 26 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध कवी गीतकार प्रशांत मोरे याची विशेष प् उपस्थितीती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकाप कार्यकर्ते रणधीरसिंह शंकरसिंह गहेरवार हे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष, प्रा.ड...
High School students : तब्बल ४६ वर्षानंतर जगदंब हायस्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र

High School students : तब्बल ४६ वर्षानंतर जगदंब हायस्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र

करियर, नांदेड
नांदेड| सोशल मिडीया, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक या माध्यमांचा कसा सकारात्मक वापर होऊ शकतो हे जगदंब हायस्कूल माहूरच्या १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी दाखवून देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांचा स्नेहमिलन सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला. माहूरच्या जगदंब हायस्कूल येथे १९७८-७९ या वर्षात शिकत असलेले माजी विद्यार्थी, सोशल मिडीया, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून एकमेकांना शोधत होते. या माध्यमांचा कसा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. याचे उदाहरण त्यांनी देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. प्रामुख्याने राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, माजी विद्यार्थी प्रकाश जगत आणि संजय रामकृष्णराव कुलकर्णी यांनी निर्माण केलेली सकारात्मक उर्जा आणि सर्वांना एकत्र करण्याची नियोजन बध्दतता यामुळे तब्बल ४६ वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्...
Awarded : “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना

Awarded : “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाडा विभागातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा "मराठवाडा आयकॉन्स २०२५" हा प्रतिष्ठीत पुरस्कार यंदा आध्यात्मिक गुरु श्री साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना प्रदान करण्यात आला. या गौरवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भव्य समारंभात विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, तसेच विभागीय आयुक्त पापळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पुरस्कारासाठी विभागातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर त...
Notary awarded : भोकरच्या ॲड. शिवाजी कदम यांना नोटरी प्रदान

Notary awarded : भोकरच्या ॲड. शिवाजी कदम यांना नोटरी प्रदान

करियर, नांदेड
भोकर,साई चौहान| येथील न्यायालयातील ॲड .शिवाजी कदम नागापूरकर यांना भारत सरकारने दिनांक १६जुलै रोजी नोटरी प्रमाणपत्र प्रदान केले. भोकर तालुक्यातील नागापूर येथील रहिवाशी ॲड शिवाजी कदम हे२००९ पासून वकिली करतात.त्यांनी उपेक्षित घटकांची वकिली न्यायालयात व न्यायालयाबाहेर केली. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जाऊन त्यांची बाजू मांडली. शेतकऱ्यांची महसुली प्रकरणे, शेतीची प्रकरणे, रस्त्याची प्रकरणे मार्गी लावली. अनेक फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळून लोकांना न्याय मिळून दिला.तालुक्यातील अनेक गावात जाऊन कायद्याची माहिती दिली. वकिली सोबतच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.मोफत वैद्यकीय सेवा, मोफत विधी सल्ला यांची माहिती देण्याचे कामही ॲड.शिवाजी कदम यांनी केले. केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नोटरी प्रमाणपत्र प्रदान केले. सरकारकड...
Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदेड, करियर
नांदेड l समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा उत्सव साजरा करताना नव्या पिढीच्या प्रज्ञेचा गौरव हा सगळ्यांच्याच मनाला आनंद देणारा क्षण असतो,प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद, नांदेड येथे गवळी समाजातील सुमारे १०० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक शिस्त, सकारात्मक बदल आणि प्रभावी प्रशासन यांचा समतोल राखत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीस मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच या कार्यक्रमात आणखी एक मान्यवर व्यक्तीमत्व मार्गदर्शनासाठी लाभत आहे दिक्षा अ‍ॅकेडमीचे संस्थापक लक्ष्मीशंकर यादव सर. शैक्षणिक क्षेत्...
error: Content is protected !!