Tuesday, July 7

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदेड, करियर
नांदेड l समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा उत्सव साजरा करताना नव्या पिढीच्या प्रज्ञेचा गौरव हा सगळ्यांच्याच मनाला आनंद देणारा क्षण असतो,प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद, नांदेड येथे गवळी समाजातील सुमारे १०० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक शिस्त, सकारात्मक बदल आणि प्रभावी प्रशासन यांचा समतोल राखत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीस मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच या कार्यक्रमात आणखी एक मान्यवर व्यक्तीमत्व मार्गदर्शनासाठी लाभत आहे दिक्षा अ‍ॅकेडमीचे संस्थापक लक्ष्मीशंकर यादव सर. शैक्षणिक क्षेत्...
PW Bhadarge : गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी पी डब्लू भदरगे रुजू

PW Bhadarge : गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी पी डब्लू भदरगे रुजू

नांदेड, करियर
नविन नांदेड l नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक पी.डी उबाळे कार्यरत होते त्यांची बदली मुदखेड पंचायत समिती येथे झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नांदेड पंचायत समिती अंतर्गत पि.डब्लू.भदरगे हे दि १५ जुलै रोजी उबाळे यांच्या कडून भदरगे यांनी गोपाळचावडी ग्रामपंचायत पदभार दिला व त्यांनी स्वीकारला आहे. भदरगे हे या पुर्वी नांदेड तालुक्यातील सिद्धनाथ ग्रा पं येथे गेल्या पाच वर्षा पासून कार्यरत होते तर त्यांची बदली गोपाळचावडी येथे झाली असून गेल्या दोन वर्षांपासून गोपाळचावडी येथे कार्यरत असलेले उबाळे यांची बदली मुदखेड पंचायत समिती येथे झाली असल्या मुळे गोपाळचावडी ग्रामपंचायतच्या वतीने दि १५ जुलै रोजी उबाळे यांना निरोप तर भदरगे यांचे स्वागत शाल श्रीफळ पुषहार टाकुण माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच साहेबराव पाटील सेलूकर . शिवसेना ओबीसी नेते तथा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीध...
Vaibhav Paitwar ; दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार यांच्या माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने सत्कार

Vaibhav Paitwar ; दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार यांच्या माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने सत्कार

नांदेड, करियर
नवीन नांदेड l सिडको शंकरनगर गुरूवार बाजार नांदेड येथील रहिवासी वैभव शिवकुमार पईतवार हा लहानपणी एका अपघातामध्ये दोन्ही हात गमाववेला विद्यार्थी जीवनाला न कंटाळता परिस्थितीवर मात करून दोन्ही हात नसताना सुद्धा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक मुंबई या पदावर यशाची शिखर गाठणारा हा विद्यार्थी खरंच खूप अभिमानकारक आहे. दोन्ही हात नसताना जिद्दिने आणि मेहनतीने सर्व संघर्षाला तोंड देत सर्व संकटाना सामोरे जात आपले ध्येय गाठणारा योद्धा वैभव पईतवारला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर विनयभाऊ गिरडे पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,बळीरामपूर ग्रामपंचायत उपसरपंच नागेश वाघमारे,नारायण भांडवले, सारंग नेरलकर ,लांडगे मामा, वाडे मामा,मुजाहिद पठाण व सर्व मित्र परिवार यांची मोठ्या...
Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

Shivaji Vidyalaya ; शिवाजी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले.पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये विद्यालयातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पाचवीतील रुद्र अमोल पेन्शनवार, जोशी स्पृहा प्रसाद,तुपकरी लक्ष गजानन,शिरसे लक्ष्मण सुमेध‌ व मळगे वरद अशोक हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत तर इयत्ता आठवीतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यामध्ये लिंगसेकर मंदार मयूर,नरवाडे मिथिलेश,बागे गणेश राजू,पांडे प्रज्वल दिलीप व जाकोरे प्रशांत प्रकाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेच्या वतीने शिष्यवृत्तीस प...
Ashish Bhore : हिमायतनगरचे आशिष भोरे यांची जर्मन ऑटोमोबाईल कंपनीकडून विदेश दौऱ्यांसाठी निवड

Ashish Bhore : हिमायतनगरचे आशिष भोरे यांची जर्मन ऑटोमोबाईल कंपनीकडून विदेश दौऱ्यांसाठी निवड

करियर, नांदेड
हिमायतनगर| जर्मनीच्या अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करणाऱ्या हिमायतनगर येथील आशिष संजय भोरे या नवतरुण युवकांस जर्मनीच्या वुर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून विदेश वारीसाठी पाठविण्यात आले आहे. भोरे कुटुंबातील पहिलाच तरुण विदेशवारी करणार असल्यामुळे आशिष चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जर्मन वुर्थ ऑटोमोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जाळे सध्या महाराष्ट्रतील नांदेड, परभणी सह हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या कंपनीमध्ये हिमायतनगरचे भूमिपुत्र आशिष संजय भोरे हे मागील दोन वर्षापासून एरिया मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कामाची उत्कृष्ट दखल म्हणून कंपनी कडून त्यांना यावर्षीच्या विदेश वारीसाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 जुलै ते 24 जुलै या दरम्यान विदेशातील कजाकिस्तानच्या दौऱ्यासाठी आशिषची निवड झाली आली. सीनियर मॅनेजर योगेश सोनवले, र...
Sambhajirao Dhulgande ; निस्वार्थ सेवाभाव : हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र – संभाजीराव धुळगंडे

Sambhajirao Dhulgande ; निस्वार्थ सेवाभाव : हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र – संभाजीराव धुळगंडे

नांदेड, करियर
नांदेड l इतरांसाठी निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मुलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेने कुणाचेही हृदयपरिवर्तन केले जावू शकते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी तथा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी केले. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या अवचित्ताने ज्येष्ठ समाजसेवी तथा नांदेड जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांचा अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लोहा तालुक्यातील पोले वाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज करत असताना कुठेही दाग न लागू देता आपला कार्यकाळ यशस्वी पूर्ण करणारे धुळगुंडे महाराज यांचा ‘निष्कलंक नेतृत्व‘ असा उल्लेख यावेळी नानक साई फाउंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केला. अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा ज्येष्ठ विधीतज्ञ शिवाजीराव हाके यांच्या हस्त...
Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळ संलग्न शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन्ही हात गमावलेल्या सिडको परिसरातील युवक वैभव पईतवार यांच्यी महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 16 जुलै रोजी सकाळी सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार डिगांबर शिंदे ,गौरव दरबस्तवार, संघटनेचे पदाधिकारी सतिश कदम, बालाजी सुताडे,दिलीप ठाकूर,वंदना लोणे, दौलतराव कदम,गणेश डोळस,गणेश ठाकूर, अमोल नांदेडकर, व पदाधिकारी.. यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या....
Kusumtai Vidyalaya CIDCO ; कुसुमताई विद्यालय सिडकोचा विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

Kusumtai Vidyalaya CIDCO ; कुसुमताई विद्यालय सिडकोचा विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

नांदेड, करियर
नवीन नांदेड l कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको येथील विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार याने 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इतिहास रचला आहे. याच यशाचं औचित्य साधून शाळेच्या प्राचार्या सौ. शशिकलाताई जाधव- बिरादार यांनी वैभवचं भव्य सत्कार करण्याचं आयोजीलं. संस्थेचे सचीव संभाजीराव बिरादार यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात यशस्वी वैभव पईतवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या शशीकला बिरादार ,पर्यवेक्षक शेख निजाम गवंडगावकर, सौ. उज्वला सावते सांस्कृतिक प्रमुख विश्वास हंबर्डे, वंदना सोनाळे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आश्चर्याची गोष्ट अशी की विजेचा शाॅक लागल्यामुळे दोन्ही हात निकामी झाले होते. कधी हाताने तर कधी पायाने अक्षरे गिरवीत हा मोठा यश त्यांनी मिळवला. आणि महसूल साहायक पदावर आरूढ झाला. तो येथे...
Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा

Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा

नांदेड, करियर
नवीन नांदेड l मराठवाड्याचे जलप्रणेते, माजी केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री .शारदा भवन शिक्षण संस्था संचलित इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.एम. शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे,पोलीस कॉन्स्टेबल वाकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, पुष्पहार आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. यात कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नुकतीच दोन्ही हाताने दिव्यांग असतानाही एमपीएससी मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या वैभव शिवकुमार पइतवा...
Ardhapur case : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा

Ardhapur case : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर प्रकरणात मोठा खुलासा

करियर, नांदेड
अर्धापूर/नांदेड| अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल या शाळेतील भौतिक सुविधांचा अभाव, अनधिकृत स्थलांतर,कर्मचाऱ्यांना त्रास, आर्थिक अनियमितता व शिक्षण व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने कडक दखल घेतली आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या निर्देशांनंतर माधव सलगर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद नांदेड यांनी तातडीने कार्यवाही करत श्री. दिलीपकुमार बनसोडे, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. गैरव्यवहारचे गंभीर आरोप शाळेच्या जागेचा वापर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले असून, अनुमती न घेता शाळेचे स्थलांतर जमजम फंक्शन हॉलच्या मागे केले गेले. याविरोधात पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांनी लेखी तक्रारी व पुरावे सादर केल्यानंतर ही चौकशी सुरू झाली आहे. याशिवाय शाळेतील कर्मचार्‍यांकडून जबरदस्ती...
error: Content is protected !!