Friday, May 15

Mrs. Wange ; मुख्याध्यापिका सौ वांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

उस्माननगर l येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक (कन्या) शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या वांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही ,पेन, उजळणी चाॅकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

अलीकडे आता वाढदिवस म्हटले की, पार्ट्या , मौज मस्ती, फटाके वाजविणे , अनाठायी खर्च करून व वेळ वाया घालवून वाढदिवस साजरा करताना पहावयास मिळतात. उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्याताई वांगे मॅडम यांनी शाळेत विद्यादान करत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.सौ.वांगे मॅडम या नेहमी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याची उब देताना दिसतात.

शाळेतील सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी देऊन उज्ज्वल यशाच्या शिखरावर नेण्याचे पवित्र कार्य करत आहेत. नुकताच शाळेमध्ये वांगे मॅडम यांनी आपला वाढदिवस इतरत्र अनाठायी खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वांगे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या व दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना देखील केली. यावेळी शाळेतील सहशिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!