नवीन नांदेड़ ; जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे अंध मुलांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अंधशाळेतील सर्व अंध मुलं मुली मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहभाग नोंदविला.
जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व व राष्ट्रीय संविधान दिनाचे महत्त्व गाण्याच्या माध्यमातून व घोष वाक्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली ,रॅलीला उत्तर देत असताना मुख्याध्यापकांनी दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने अनेक शासनाच्या योजना याबद्दल माहिती दिली, त्याचबरोबर दिव्यांगाचा जन्मदर कमी व्हावा ते होऊच नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची सुद्धा माहिती या रॅलीमध्ये देण्यात आली .
व्दियांग दिनाच्या अनुषंगाने विविध मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या,यात लांब उडी,उंच उडी 50 मीटर 100 मीटर धावणे .गोळा फेक. थालीफेक.
पासिंग द बॉल,बुद्धिबळाचा खेळ यासह गीत गायनाचा कार्यक्रम भावगीत भक्ती गीत, देशभक्तीपर गीत, बालगीत ,भारुड संविधानावर चे गीत असे विविध कार्यक्रम करण्यात आले व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं ,या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक बाबाराव इबितवार तसे शाळेचे कर्मचारी पंकज शिरभाते ,
रामराव जोजार. संजय पाटील, सुरेश होळंबे, भास्कर आणेराये ,नामदेव इंगलें ,बलभीम केंद्रे,मनोज कुमार कलवले नागनाथ कुचेवार. सुबना केंद्रे ,आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.