Gutkha seized : अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही; हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून गुटखा जप्त

नांदेड| सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी केली. (Food and Drug Administration action; Gutkha seized from two grocery stores in Himayatnagar)

तपासणी मे. प्रणव किराणा स्टोअर्स, दीक्षाभूमी चौक, हिमायतनगर या पेढीतून दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर हिमायतनगर या व्यक्तीच्या ताब्यातून राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, मुसाफीर पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण २७ हजार ६८८ रुपये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. संबंधित हजर व्यक्ती विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३,२७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायतनगर येथे फिर्याद दाखल केली आहे.

तसेच मे.सलीम किराणा स्टोअर्स, खुबा चौक, हिमायतनगर या पेढीची तपासणी वेळी राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १ हजार ९५० रुपये एवढ्या किंमतीचा साठा आढळला. या पेढीतील हजर व्यक्ती अब्दुल अहमद लाल मोहम्मद वय वर्ष ४७ रा. सुभाष चौक, हिमायतनगर व पेढी मालक अब्दुल जब्बार अब्दुल मजीद खुबा चौक, हिमायतनगर यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी, अनिकेत भिसे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३, २७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायतनगर येथे फिर्याद दाखल केली आहे.

तपासणी नंतर सदर दोन्ही पेढी सील करण्यात आल्या. सदरची कार्यवाही सहायक आयुक्त राम भरकड व सहायक आयुक्त संजय चट्टे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलीस निरीक्षक अमोल भगत व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button