हदगांव| दैनिक वृत्तरत्न सम्राट व दैनिक रोख ठोख चे हदगांव तालूका प्रतिनिधी तथा दै.प्रबुध्द परिवार चे उपसंपादक आंबेडकरवादी निर्भिड पत्रकार गौतम कदम पाथरडकर (Journalist Gautam Kadam announced state-level Bahujan Ratna Lifetime Achievement Award) यांची राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


आपण आपल्या लेखनीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्याची दखल घेत “मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा” करत राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२५ बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आपण बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संघर्षातून मिळणारे यश मोठे आहे. यामुळे आपली सदर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. असे आयोजकांनी म्हटले आहे.

तसेच लोकप्रतिनिधी,जेष्ठ पत्रकार,शासकीय अधिकारी व जेष्ठ सामाजिक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,सुलोचना माहेरघर (महिला आश्रम),लताई बाल अनाथालय,भोकर ता.चिखली जि.बुलढाणा आयोजित पुरस्कार वितरण सोहळा दि.०६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. श्री शिवाजी विज्ञान वा कला महाविद्यालय (श्री शिवाजी सिनियर कॉलेज) चिखली जि.बुलडाणा येथे संपन्न होणार आहे.

तरी आपण आपल्या परिवारासह मित्रमंडळी व शुभचिंतक यांच्या सह उपस्थित राहून या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार व्हावे. प्रेरणा आणि प्रोत्सहान मानवी जीवनासाठी व बहुजन चळवळ तेवत ठेवण्यासाठी शक्तीवर्धकाचे कार्य करतात. असे अध्यक्षा सौ.लता अविनाश डोंगरदिवे,व्यवस्थापक प्रशांत डोगरदिवे यांनी आपल्या संदेशात म्हणून आपल्याला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा… दिल्या आहेत.
