Journalist Gautam Kadam : पत्रकार गौतम कदम यांना राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कार जाहीर
हदगांव| दैनिक वृत्तरत्न सम्राट व दैनिक रोख ठोख चे हदगांव तालूका प्रतिनिधी तथा दै.प्रबुध्द परिवार चे उपसंपादक आंबेडकरवादी निर्भिड पत्रकार गौतम कदम पाथरडकर (Journalist Gautam Kadam announced state-level Bahujan Ratna Lifetime Achievement Award) यांची राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
आपण आपल्या लेखनीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्याची दखल घेत "मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा" करत राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२५ बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आपण बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. स...

