Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ram Patil Ratolikar : जनतेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आपला निर्धार- राम पाटील रातोळीकर -NNL

Ram Patil Ratolikar : जनतेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आपला निर्धार- राम पाटील रातोळीकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जनतेतून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडून आलो, तर कार्यकर्त्यांना योग्य ती संधी देता येईल, शासन स्तरावर जनतेची कामेही सन्मानपूर्वक करता येतील, त्यामुळे पुन्हा विधान परिषदेवर न जाता आपण निवडणुकीला सामोरे जावे, असा असा मनाशी पक्का निर्धार करून आपण लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहोत, त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे सहकार्य आपल्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रातोळी येथे आयोजित देगलूर-बिलोली व नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद व स्नेहभोजन मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले,आपण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना शासनस्तरावर जी कामे सन्मानपूर्वक झाली, त्या तुलनेत विधान परिषद सदस्य असताना 25 टक्केही झाली नाहीत. जनतेतून निवडून आल्य...
Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नवीन नांदेड| आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आल्याच्या निषधार्थ जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश मधील तिरूमला तिरुपती देवस्थान येथे अतिशय संताप जनक प्रकार समोर आला आहे. भक्तांना वाटणाऱ्या लाडू प्रसाद मध्ये शुद्धतुप ऐवजी माशापासून व वेस्टेज मटन पासून निघणाऱ्या ऑइल आणि डुकराची चरबी गाई म्हशीचे गिफ्ट या लाडू प्रसादामध्ये वापरण्यात आले. हे केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने काल उघडीस आणले लाखो हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा खेळणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवणाऱ...
Bhagyashree Jadhav : तुम्ही जगण्याची उर्मी द्या, मी निश्‍चित पदक मिळविन -NNL

Bhagyashree Jadhav : तुम्ही जगण्याची उर्मी द्या, मी निश्‍चित पदक मिळविन -NNL

करियर, नांदेड
नांदेड| माझ्या यशामध्ये डॉक्टर मंडळींचा मोलाचा वाटा आहे. मी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पद मिळवू शकले नाही. याची मला खंत आहे. पण मी डगमगणार नाही. तुम्ही मला जगण्याची उर्मी द्या. भविष्यात मी निश्‍चित पदक मिळविन असे आत्मविश्‍वासात्मक उद्गार आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी यापदी निवड झालेली भाग्यश्री जाधव हिने शनिवारी येथे बोलताना काढले. नांदेड शहरातील महावीर कॉलनी येथील नारायणा सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटलच्या सभागृहात नारायणा फाऊंडेशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरोपिस्टस वुमनसेल नांदेड, रोटरी क्लब नंदीग्राम, निनाद फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर नांदेड या पाच सेवाभावी संस्थांच्यावतीने एका नेत्रदिपक सोहळ्यात भाग्यश्री जाधव हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ती बोलत होती. या सोहळ्यास हैद्राबाद येथील ॲपोलो हॉस्पिटलमधील निष्णांत हृदयरोग ...
educational work : शैक्षणिक कार्यासाठी प्रथम संस्थेने स्वयंसेवकांना दिले प्रशिक्षण -NNL

educational work : शैक्षणिक कार्यासाठी प्रथम संस्थेने स्वयंसेवकांना दिले प्रशिक्षण -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत किनवट ऑफिस मध्ये स्वयंसेवकांना प्रशिक्षण घेण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत किनवट तालुक्यातील 25 गावांमध्ये आमचे गाव उपक्रम चालू आहे. त्यातील 8 गावातील 15 स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. यादरम्यान प्रथम संस्थेचे जिल्हा समन्वयक अनंता वायसे यांनी स्वयंसेवकांना प्रथम काय काम करते. आणि आमचे गाव उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. प्रथमचे प्रतिनिधी गावात काय काम करते. या बद्दल चर्चा करण्यात आली. गावामध्ये स्वयंसेवक म्हणून तुमची भूमिका काय असेल. या बद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली व दुसरी, तिसरी व पाचवी यांच्यासोबत शाळेमध्ये काय काम केल्या जाते. तसेच गावामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवीच्या सोबत गटात कोणकोणत्या कृती केल्या जातात. मुलांचा पाया मजबूत होण्यासाठी माता गटांची बांधणी करण्या...
The tradition of success : जिल्हा परिषद कनकवाडी शाळेचे यशाची परंपरा कायम -NNL

The tradition of success : जिल्हा परिषद कनकवाडी शाळेचे यशाची परंपरा कायम -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी येथील विद्यार्थ्यांच्या संघानी यशाची परंपरा कायम ठेवली असून तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मातोश्री कमलबाई ठमके इंग्लिश स्कूल कोठारी येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो खेळात 14 वर्षाखालील मुले आणि मुली या दोन्ही गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी संघांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत तालुक्यातील नामांकीत शाळेतील संघाना पराभूत केले. विशेष म्हणजे गतवर्षी सुद्धा याच शाळेतील मुले आणि मुली दोन्ही संघ जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. आतापर्यंत या स्पर्धेत विजयी संघ विद्यार्थ्यांचे गावातील पालक तसेच शिक्षणप्रेमी, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक शेख इब्राहीम व सहशिक्षक मुंडे सर, पवार सर, गायकवाड...
illegal liquor sale and distillation : अवैध दारू गाळप व विक्रीचे समूळ उच्चाटनासाठी दिनांक 21 रोजी ‘मासरेड’ -NNL

illegal liquor sale and distillation : अवैध दारू गाळप व विक्रीचे समूळ उच्चाटनासाठी दिनांक 21 रोजी ‘मासरेड’ -NNL

नांदेड, क्राईम, लातूर, हिंगोली
नांदेड| पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून हातभट्टी दारू २८८२ लिटर, दारूचे रसायन ३६१० लिटर, देशी दारु २८१० बॉटल, विदेशी दारु ७५ बॉटल असे १६६ दारुबंदी केसेस मध्ये १६९ आरोपींकडून एकूण ९ लक्ष ८१ हजार २०५ चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या जिल्ह्यात हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 25 ऑगस्ट व दिनांक 21.9.2024 रोजी परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'मासरेड' चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली...
Lower Panganga Dam : निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीची कापेश्वर येथे २७ सप्टेंबर रोजी जाहीर सभा -NNL

Lower Panganga Dam : निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीची कापेश्वर येथे २७ सप्टेंबर रोजी जाहीर सभा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहरे| निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबवा व गावे न बुडवता प्रकल्प कसा करता येईल त्याचा अभ्यास करा.या सूचना देत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्रजी फडणीस यांनी जुलै महिन्यात मुंबई येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्तीक बैठकीत पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या मात्र प्रत्यक्षात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी झाल्याचे दिसत नसून प्रत्यक्षात धरणाचे काम करण्याच्या हालचालींनी वेग घेतल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता कापेश्वर येथील कपिलेश्वर मंदिरावर निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्त्वाची व तातडीची बैठक बोलाविण्यात आल्...
ration of happiness : गौरी गणपती उत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना; ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांची थट्टा -NNL

ration of happiness : गौरी गणपती उत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना; ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरीबांची थट्टा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध योजनांच्या घोषणाचा पाऊस पाडल्या जात आहे. परंतु, राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या यातील बहुतांश योजनांची अमलबजावणी मात्र म्हणावे त्या प्रमाणात प्रभावी पणे व दिलेल्या मुदतीत होत नसल्यामुळे योजनेस पात्र लाभार्थ्यांची उपेक्षा भंग होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. केंद्र शासनाकडून सोयाबीन व कपाशीच्या हमी भावातील तफावत दुर करण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकऱ्याना प्रती हेक्टरी ५००० रुपये एवढी रक्कम देण्याचे मागील बऱ्याच दिवसा पूर्वी जाहीर करण्यात आले होते. यावर राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी या संदर्भात अनुदान वाटपाची डेडलाईन देखील जाहीर केली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष या अनुदानाच्या रक्कमेकडे लागले होते. परंतु अद्य...
Journalist Bajirao Patil Kalkekar : पत्रकार बाजीराव पाटील कळकेकर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड – NNL

Journalist Bajirao Patil Kalkekar : पत्रकार बाजीराव पाटील कळकेकर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड – NNL

करियर, नांदेड
उस्माननगर| दैनिक लोकनेताचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सभासद आणि न्यूनगंड बाजूला ठेवून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले बाजीराव पाटील कळकेकर यांची पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड सं. अ. बीबी वैद्य यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर पांडे, यांनी सदरील निवड करण्यात आली आहे. पत्रकार दैनिक लोकनेता वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी बाजीराव पाटील कळकेकर हे अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रांमध्ये काम केले आहे . सामाजिक भावनेतून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी दैनिक लोकनेता मधून प्रश्न मांडून न्याय देण्याचे कार्य करत असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडामोडी वर बारकाईने व अभ्यासपूर्वक लक्ष देऊन बातमी संकलन करतात. जिल्ह्यात व ग्रामीण भागात ब...
Drm Niti sarkar ; स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो! – श्रीमती नीति सरकार -NNL

Drm Niti sarkar ; स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो! – श्रीमती नीति सरकार -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। भारतीय रेल्वे मध्ये ‘स्वच्छता ही सेवा 2024’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत दिनांक 21/09/2024 रोजी, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेला मदत करण्याचे आवाहन केले. संवादा दरम्यान त्यांनी प्रवाशांना सांगितले कि ‘स्वच्छ भारताचा प्रवास आपल्यापासून सुरू होतो. तसेच या गाडीमध्ये स्वच्छता ठेवणाऱ्या कर्मचार्यांशी हि संवाद साधला, स्वच्छता राखण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी नोंद घेतली आणि त्यांना आणखी सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतर श्रीमती सरकार यांनी नांदेड रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेची पाहणी केली आणि संबंधित अधिकार्यांना यात सुधारणा करण्याचे आदेशित केले. या प्रसंगी रामचंद्र साहू, वरिष...
error: Content is protected !!