Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Rahul Gandhi : थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते – राहुल गांधी -NNL

Rahul Gandhi : थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते – राहुल गांधी -NNL

नागपूर, राजकीय
नागपूर/मुंबई| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रिबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत, ते लपून हल्ला करतात, आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता, असा घणाघाती हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वतःबद्दल बोलत नसत, ते ...
Devendra Fadnavis : ७ नोव्हेंबर रोजी किनवट येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा -NNL

Devendra Fadnavis : ७ नोव्हेंबर रोजी किनवट येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहुर विधानसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ उद्या दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी हुतात्मा शंकरशाहा गोंड राजे मैदान किनवट येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधीर्‍यांनी केले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याच्या उद्देशाने प्रचाराला सुरुवात केली असुन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपुर्ण महाराष्ट्रात प्रचार सभाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा शंकरशाहा गोंड राजे मैदान किनवट येथे प्रचार सभेचे आयोजन करण्य...
Shri Shiv Mahapuran Katha and Tulshi marriage program : लखमापूर येथे श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे आज पासून भव्य आयोजन -NNL

Shri Shiv Mahapuran Katha and Tulshi marriage program : लखमापूर येथे श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे आज पासून भव्य आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगडाच्या पायत्याशी असलेल्या मौजे लखमापूर गावामध्ये प्रथमचः परमपुज्य धर्माचार्य श्रीकृष्णाकुमार पांडेय (शास्त्री) श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) यांच्या सुमधूर वाणीतून श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे दि.०६ ते १२ नौव्हेंबर २०२४ या सातदिवसाच्या कालावधी दरम्यान दु.१ ते ४ वा.पर्यंत येथील उमा महेश्वर आश्रम लखमापूर याठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले असून दि.१३ नोव्हेंबर रोजी भव्य कलश यात्रा व श्रीकृष्ण विवाह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प.पु.महंत श्री प्रयागराज गीरी (बापू) महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या आयोजनाच्या माध्यमातून दि.०६ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. पंकजपाल महाराज (सत्यपाल महाराजांचे शिष्य) यांचे किर्तन,दि.०७ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे (व्यसनमुक्ती सम्राट) इसापुर (महाराष्ट्र शासन पुरस्क...
MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

MLA Madhavrao Patil : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगांव हिमायतनगर विधानसभा २०२४ च्या निवडणूक रिंगणात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर उतरले आहेत. आजपासून त्यांच्या प्रचारांला सुरुवात करण्यात आली असून, हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर, शिवपती महादेव, मानाच्या वडाच्या गणपतीचे दर्शन घेऊन बुधवारी सकाळी ७ वाजता प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. फटाक्याची अतिशबाजारी करत हिमायतनगर शहरातील प्रचार कार्यालयांच उदघाटन करून प्रचार दौऱ्याला धुमधडाक्यात सुरुवात आली आहे. याप्रसंगी मंचावर उपस्थित श्यामराव देशमुख सरसमकर, कृष्णा पाटील आष्टीकर, गणेशराव शिंदे, विठ्ठल ठाकरे, परमेश्वर गोपतवाड आदींनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून निवडणूक काळात गाफील न राहता अंग झटकून स्वतः उमेदवार समजून काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार माधवराव पाटील जवळगावकर ...
Bharatiya Janata Party : नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असणे आवश्यक -NNL

Bharatiya Janata Party : नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असणे आवश्यक -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असणे आवश्यक आहे. जर आपला खासदार नसेल तर आपल्याला निधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे विरोधी पक्षात जाऊन बसण्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले. भाजपाचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे हे काल नायगाव , नरसी दौऱ्यावर होते. नरसी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगाव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता उपस्थित कार्यकर्त्यांशी , पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. यावेळी खा. डॉ. अजित गोपछडे ,जिल्ह...
The coconut of propaganda burst : भाजपा उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला -NNL

The coconut of propaganda burst : भाजपा उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला -NNL

नांदेड, राजकीय
भोकर| भोकर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण आणि लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचाराचा नारळ मुदखेड तालुक्यातील बारड येथील शितलादेवी मंदिरात आज फोडण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , लोकसभेचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे , जिल्हा अध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख , निलेश देशमुख , बाळासाहेब देशमुख , गोविंदराव शिंदे नागेलीकर ,नरेंद्र चव्हाण , पूजा व्यवहारे , जया देशमुख, कोमल जयस्वाल , बालाजी खटीक, शामराव तेळके, प्रभाकर आठवले , देवा पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास सुरू आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजक आणि व्यापाऱ्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र हा विकास पोहचण्यासाठी आपला खासदार पराभूत झालं होता. परंतु आता ...
Madhav devsarkar ; स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार देवसरकर माधवराव यांचा प्रचार प्रारंभ -NNL

Madhav devsarkar ; स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार देवसरकर माधवराव यांचा प्रचार प्रारंभ -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव।आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार माधव दादाराव देवसरकर यांनी दत्तबर्डी येथे प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. प्रचार प्रारंभाचे औचित्य साधून आज दत्तबर्डी येथे नारळ फोडून प्रचार मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मतदारसंघातील विविध गावांतील शेकडो कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देवसरकर यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी स्वराज्य पक्षाच्या धोरणांचे समर्थन करत, मतदारसंघातील विकासासाठी त्यांची एकजूट व समर्पण स्पष्ट केले.   उद्घाटनाच्या या कार्यक्रमास स्वराज्य पक्षाचे विविध पदाधिकारी, व परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी, तसेच मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने देवसरकर ...
Shiv Sena Nanded ; शिवसेना नांदेड दक्षिण‌ शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे‌ गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती – NNL

Shiv Sena Nanded ; शिवसेना नांदेड दक्षिण‌ शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे‌ गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे ‌गटाचा नांदेड दक्षिण‌ जिल्हाप्रमुख पदी नावामनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे स्वागत मित्र मंडळ व‌ पदाधिकारी यांनी फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये करुन अभिनंदन केले. दक्षिण विधानसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख आंनद‌ पाटील बोढांरकर यांना दक्षिण विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्याने रिक्त पदावार विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे, सदरील नियुक्ती बदल मुख्यमंत्री एकनाथराव ‌शिंदे यांनी ‌अभिष्टचिंतन केले असून, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिले आहे,तर शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून सदरील नियुक्ती कालावधी एक वर्ष आहे . विनय पाटील गिरडे यांच्या नियुक्ती मुळे नांदेड दक्षिण...
Election Inspector ; निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83-किनवट निवडणूक कामाची केली पाहणी – NNL

Election Inspector ; निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83-किनवट निवडणूक कामाची केली पाहणी – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l निवडणूक निरीक्षक (सामान्य) शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांनी 83- किनवट विधानसभा मतदार संघातील निवडूक विषयक कामकाजाचा आढावा घेवून काही मार्गदर्शक सूचना केल्या. श्री शैलेंद्र कुमार यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्र. 7499127265हा आहे. Observer code-G-35602 हा आहे. ते ८३ किनवट विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ते काम पाहत आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 83-किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी नियुक्त केलेल्या सर्व कक्षाचे प्रमुख तथा सर्व नोडल अधिकारी यांची त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात बैठक घेवुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांची सुद्धा आदर्श आचारसंहितेबाबत बैठक घेवुन मार्गदर्शन केले. सदर बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी मेघना ...
Meeting of election inspectors ; आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षकांची बैठक संपन्न – NNL

Meeting of election inspectors ; आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षकांची बैठक संपन्न – NNL

नांदेड, सोशल वर्क
हदगाव l हदगाव विधानसभा मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे,आदर्श आचारसंहितेचे मतदारसंघात काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मा निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री शैलेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची बैठक नुकतिच संपन्न झाली या बैठकीत निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या उमेदवारांनी ही या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले त्यांचे निरसन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले.या बैठकीनंतर निवडणूक निरीक्षक श्री.शैलेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा याप्रसंगी निवडणूक निरीक्षकांनी घेतला. या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा नांदे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर...
error: Content is protected !!