Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Helping hands ; हेलपिंग हँडस सामाजिक संस्थेकडून दिवाळी निम्मित अनाथ मुलांना फूडस व फटाके वाटप -NNL

Helping hands ; हेलपिंग हँडस सामाजिक संस्थेकडून दिवाळी निम्मित अनाथ मुलांना फूडस व फटाके वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। काल दि.५ रोजी हेलपिंग हँडस या सामाजिक संस्थेकडून गरीबां मध्ये अन्न वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केली आहे. तसेच दिवाळी निम्मित अनाथ मुलांना फूड पॅकेट्स व फटाक्याचे वाटप करण्यात आले . या वेळेस संस्थेचे अध्यक्ष संकेत केंद्रे उपस्थित होते. हेलपिंग हँडस या सामाजिक संस्थेला ५ वर्ष पूर्ण झालेली असून, ही संस्था सतत गरिबांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करण्यात यशस्वी ठरली आहे. इतकंच नसून या संस्थेने ५ वर्ष यशस्वी रित्या पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून दिवाळीच्या पर्वकाळात गोर गरीबांमध्ये अन्न वाटून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. याच बरोबर गेली ५ वर्षात १०० कार्येक्रम उत्कृष्टपणे राबून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ८ हजार पेक्षा जास्त गरजू लोकांना मदत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला असल्याने सर्व स्तरातील नागरिकांतून संस्थेच्या सामाजिक कामाचे कौतुक केले जाते आहे. ...
Prataprao patil chikhalikar ; लोहा कंधारच्या विकासाला कटीबद्ध – माजी खा .‌प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao patil chikhalikar ; लोहा कंधारच्या विकासाला कटीबद्ध – माजी खा .‌प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा। लोहा कंधार तालुक्यात शेकडो एकर जमीन सिंचनाखाली आली ते लिंबोटी धरण माझ्या पहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये पूर्णत्वास गेले तसेच नॅशनल हायवे निर्माण झाला.नांदेड लोहा लातूर या प्रलंबित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याची मंजुरी मी खासदार असताना मिळाली.अनेक कामे करता आली.पुढील काळात आपण लोहा मतदार संघाच्या विकासाचा वादा करीत आहोत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना महायुती कटिबद्ध आहोत असा विश्वास प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला लोहा शहरातील जिजामाता फँक्शन हॉल मध्ये भरगच्च पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण स्क्रीन वर लावण्यात आले होते तत्यानंतर पत्रकार परिषदेत प्रतापराव पाटील चिखलीकर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी प्रदेश उपाध्यक्ष ,वसंत सुगावे, भाजपा प्रद...
combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर नांदेड पोलीसांचे कॉम्बींग ऑपरेशन करून सव्वा तीन लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर नांदेड पोलीसांचे कॉम्बींग ऑपरेशन करून सव्वा तीन लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीचे पुर्वतयारी अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 04.11.2024 रोजी 05.00 वा. ते 09.00 वाजेदरम्यान कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर कॉम्बींग ऑपरेशन मध्ये स्वतः अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी भाग घेतला असुन, त्यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड जिल्हा, मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार, स्थागुशा अं...
Hirdesh Kumar : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार -NNL

Hirdesh Kumar : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार -NNL

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस ...
Murder Crime ; पैशाच्या वादातून एकाचा खून; मालवाहू वाहनाने धडक देऊन केले डोक्यावर टॉमीने वार -NNL

Murder Crime ; पैशाच्या वादातून एकाचा खून; मालवाहू वाहनाने धडक देऊन केले डोक्यावर टॉमीने वार -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। उसनवारी चे चाळीस हजार रुपये परत देत नसल्याचा वाद विकोपाला जाऊन काल दिनाक ५ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास आरोपीने शेळी चरण्यासाठी जात असलेल्या मयत किरण विट्ठल खिरे वय ( २६ ) यांच्या अंगावर मालवाहू टाटा एस गाडी टाकून जखमी केले. व डोक्यावर गाडी तील टामी ने वार केले यात किरण विट्ठल खिरे याचा मृत्यू झाला.पैशाचा वादातून खून झाल्याची ही खळबळजनक घटना माहूर तालुक्यातील हिंगणी येथे घडली. मौजे हिंगणी येथील किरण विट्ठल खिरे वय २६ वर्ष हे नेहमीप्रमाणे सकाळी बकऱ्या घेऊन जंगलाकडे जात असताना गावा पासून केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर आरोपी संतोष उत्तम शिंदे वय ३२ वर्ष रा.हिंगणी याने आपल्या स्वतःच्या मालकीच्या टाटा एस छोटा हत्ती मालवाहू वाहन क्रमांक एम एच १२ यु एम ४३४५ भरधाव वेगात नेऊन किरण ला जोरदार धडक दिली. त्यामुळे किरण खिरे याच्या डोक्यात जबर मार लागला व तो खाली पडला आरोप...
Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

नांदेड, करियर
नांदेड। मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत राहून पुरस्कार सोहळ्यासह विविध उपक्रम राबवणारे दै. समीक्षाचे संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबई येथील आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रालय सुरेंद्र गावस्कर सभागृह, नायगाव, दादर (पूर्व) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळापासून विविध वर्तमानपत्रात सेवा देत सतरा वर्षांपासून दै. समीक्षा वृत्तपत्र काढून अन्यायाविरुद्ध वाचा फोडत वंचितचा लढा देण्यासाठी पुढाकार घेण्याचे कार्य संपादक रुपेश पाडमुख हे सातत्याने करत आहेत. एवढ्यावरच न थांबता वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देणार्‍यांना पुरस्कार देण्यासह शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, पोलीस दलाती...
The Diwali morning  जगविख्यात गझल गायक, गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या मैफिलीने दिवाळी पहाटचा समारोप, श्रोते मंत्रमुग्ध -NNL

The Diwali morning जगविख्यात गझल गायक, गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या मैफिलीने दिवाळी पहाटचा समारोप, श्रोते मंत्रमुग्ध -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| दिवाळी संध्या २०२४ उपक्रमात जगद्विख्यांत गझलगायक, गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफल बंदाघाट येथे संपन्न झाली. गोदावरीचा रम्य काठ, दिवाळीचा झगमगाट असलेला खुला रंगमंच, प्रेक्षकांनी खचाखच भरलेला बंदा घाट, भीमरावांच्या गझलेचे आर्त स्वर आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांचे उत्साहवर्धक निवेदन असा आगळा वेगळा माहोल असलेल्या मैफलीने रसिकांची मने जिंकली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड वाघाळ मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गझलेचा हा सोहळा नांदेडकरांनी अनुभवला. मैफलीची सुरुवात अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा, या इलाही जमादार यांच्या प्रसिध्द गझलेने झाली. माणसांचे विविध स्वभाव व त्याचा स्वतःशी होणारा संवाद या बाबी प्रकर्षाने भीमरावांच्या तलम रेशमी स्वरातून नमूद झाल्या. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या,  जीवनाला दान द्यावे लागते, या गझलेने खर्‍या जीवनातील वेदनेचा निचो...
Prepare the system for assembly elections : विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार -NNL

Prepare the system for assembly elections : विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार -NNL

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते. श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या 16 नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अ...
The media should give balanced justice : माध्यमांनी सर्व उमेदवारांना समतोल न्याय द्यावा – राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी व्यक्त केली अपेक्षा -NNL

The media should give balanced justice : माध्यमांनी सर्व उमेदवारांना समतोल न्याय द्यावा – राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी व्यक्त केली अपेक्षा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुद्रीत व अन्य सर्व माध्यमामध्ये सर्व उमेदवारांना प्रसिध्दीचा समतोल न्याय मिळावा, अशी अपेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी आज झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांना सर्व उमेदवारांना समतोल न्याय देण्याचे आवाहन केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला सामान्य, खर्च आणि पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. यात श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे), शेलेंद्रकुमार (भाप्रसे), श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे), रण विजय यादव (भाप्रसे), कालु राम रावत (भापोसे), मृणालकुमार दास (आयआरएस), मयंक पांडे (आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा पोलीस अध...
Special program : स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम -NNL

Special program : स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला. भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदा...
error: Content is protected !!